”म्हशीचं हंबरणं चालेल, पण अमृता फडणवीसांचा आवाज सहन होत नाही”

दिग्दर्शक, निर्माता महेश टिळेकर यांची अमृता फडणवीसांच्या गाण्यावर टीका

mahesh-tillekar-amruta-fadnavis-news-song
mahesh-tillekar-amruta-fadnavis-news-song

मुंबई l अमृता फडणवीस यांचं एक नवं गाणं रसिकांच्या भेटीस आलं आहे. हे गाणं पाहून काही नेटकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त करत अमृता फडणवीस Amruta fadnavis यांच्यावर टीका केली. या टीकाकारांमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता महेश टिळेकर देखील आहेत. “गायी म्हशीच्या हंबरण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण हा आवाज सहन होत नाही”, असं म्हणत त्यांनी अमृता फडणवीस Amruta fadnavis यांना खरंच गाता येतं का? सवाल केला आहे.

भाऊबीजेच्या निमित्ताने त्यांनी हे गाणं गायलं आहे. त्यांनी हे गाणं राज्यातील प्रत्येक  भाऊरायाला समर्पित केलं आहे. या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. महेश टिळेकर हे सोशल मीडियावर सक्रिय असतात.समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ते रोखठोकपणे आपली भूमिका मांडतात

यावेळी त्यांनी अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर निशाणा साधला आहे. “चांगला आवाज असूनही केवळ नाव नाही हाती भरपूर पैसा नाही म्हणून नवीन गायकांना कुणी मदतीचा हात देऊन संधी देणारा पाठीशी उभा राहत नाही. मधुर आवाज असलेल्या महाराष्ट्रातील अनेक नवीन गायकांना साधी कुठं संधी मिळत नाही पण जिचा आवाज ऐकला की कानाचे पडदे फाटण्याची भीती निर्माण होते, लाखो तरुणांच्या ह्रदयात धडकी भरते आणि गाणं हे दुसऱ्याला आनंद देण्याऐवजी दुःख देण्यासाठीच गायले जाते असा समजच होण्याची शक्यता निर्माण होते अशी एक आपल्याच विश्वात धुंद होऊन गाणारी विश्र्वगायिका लोकांना सातत्याने का छळत आहे?

हेही वाचा l  Jaysingrao Gaikwad l माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांचा भाजपाला रामराम

गायी म्हशीच्या हंबरडण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण या गायिकेचा आवाज ऐकून तिच्या आवाजाला अनेकांनी शब्दरुपी श्रद्धांजली वाहिली तरीही ही स्वयंघोषित गायिका मी पुन्हा गाईन मी पुन्हा गाईन म्हणत आपल्या गळ्याचा व्यायाम थांबवायचे नाव घेत नाही.

आपल्याकडे जुनी म्हण आहे ” आडात नसेल तर पोहऱ्यात येणार कुठून? केवळ ह्या अश्या गायिकेला प्रोमोट करण्यासाठी तिला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्यासाठी टी सिरीज सारखी ,नेहमीच बिझिनेसला प्राधान्य देणारी कंपनी का पैसा खर्च करत आहे,?त्यामागे काय लागेबांधे आहेत ? हे एक न सुटणारे कोडे आणि जर ह्या गायिके कडे स्वतःचा अतिरिक्त खूपच पैसा असेल तर तिने एखादं संगीत विद्यालय सुरू करून नवोदित गायकांना चांगल्या संगीत शिक्षकांचे मार्गदर्शन होईल यासाठी स्वतः न गाता फक्त संगीत सेवा करावी.

हेही वाचा l Bhaskar Jadhav l पोटापाण्यासाठी दारु विकली तर काय बिघडलं?, तुम्ही हप्ते घेत नाही का?

पण काहीही म्हणा लता मंगेशकर यांनी गायलेल्या ” आज अमृताचा घनु..या ओळीतील अमृता हा शब्द लता दीदींच्या मुखातून ऐकायला आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवितून वाचायलाच योग्य वाटतो.इतरांनी फक्त त्या अमृता नावाची किमान लाज राहील याचा तरी प्रयत्न करावा.” अशा शब्दात त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here