ममता बॅनर्जींनी 291 उमेदवारांची यादी केली जाहीर; 52 महिला आणि 42 मुस्लिम उमेदवारांना तिकीट

24 विद्यमान आमदारांना तिकीट नाकारले, 100 नवीन चेहऱ्यांना संधी

mamata-banerjee-tmc-party-candidate-list-announcement-news-updates-west-bengal-assembly-election-2021-latest-news
mamata-banerjee-tmc-party-candidate-list-announcement-news-updates-west-bengal-assembly-election-2021-latest-news

पश्चिम बंगाल: आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी West-bengal-assembly-election-2021 तृणमूल काँग्रेसच्या TMC अध्यक्षा, राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी Mamata-banerjee सर्व 291 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. TMC च्या यादीत 100 नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यंदा 50 महिला आणि 42 मुस्लिम उमेदवारांना संधी मिळाली आहे. 24 विद्यमान आमदारांचे तिकीट कापले आहे. उमेदवारांची यादी जाहीर केलेला तृणमूल पहिलाच पक्ष आहे. mamata-banerjee-tmc-party-candidate-list-announcement-news-updates-west-bengal-assembly-election-2021-latest-news

तृणमूल दार्जिलिंगच्या 3 जागांवर आपले उमेदवार उतरवणार नाही, या जागा सहयोगी पक्षासाठी सोडण्यात आल्या आहेत. दरम्यान, स्वतः ममता बॅनर्जी नंदीग्रामवरुन निवडणूक लढवणार आहेत. नंदीग्राम ममता बॅनर्जींचे जवळचे आणि आता भाजपमध्ये प्रवेश केलेले शुभेंदु अधिकारी यांचा बालेकिल्ला आहे.

हेही वाचा: ”अनुराग, तापसीला शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहण्याची किंमत मोजावी लागली”

नुकतेच पक्षात सामील झालेला माजी क्रिकेटर मनोज तिवारीला पक्षाने हावडाच्या शिवपूरमधून उमेदवारी दिली आहे. याशिवाय, भवानीपूरमधून शोभन देव चटोपाध्याय निवडणुकीच्या मैदानात असतील. ममता सरकारमध्ये अर्थ मंत्री राहिलेले अमित मित्रा निवडणूक लढवणार नाहीत. पक्षाने यंदा 24 विद्यमान आमदारांना तिकीट नाकारले आहे.

बंगालमध्ये 8 टप्प्यात निवडणूक
पश्चिम बंगालमध्ये यंदा 8 टप्प्यात निवडणुका होणार आहेत. 294 जागेच्या विधानसभेसाठी मतदान 27 मार्च (30 सीट), 1 एप्रिल (30 सीट), 6 एप्रिल (31 सीट), 10 एप्रिल (44 सीट), 17 एप्रिल (45 सीट), 22 एप्रिल (43 सीट), 26 एप्रिल (36 सीट), 29 एप्रिल (35 सीट) होणार आहे. तसेच, या निवडणुकीचा निकाल 2 मे रोजी जाहीर होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here