Maria sharapova : टेनिस स्टार मारिया शार्पोव्हा झाली आई; इन्स्टावर शेअर केले बाळाचे फोटो

maria-sharapova-announces-birth-of-her-son-theodore-news-update-today
maria-sharapova-announces-birth-of-her-son-theodore-news-update-today

वॉशिंग्टन : रशियाची माजी टेनिसपटू मारिया शार्पोव्हानं (Maria sharapova) तिच्या चाहत्यांना खूशखबर दिली आहे. शार्पोव्हा आई झाली असून एका गोंडस मुलाला तिनं जन्म दिला आहे. आपला पती अलेक्झांडर गिल्क्स याच्यासह बाळाचे फोटो तीनं इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.(Maria Sharapova announces birth of her son Theodore)

सोशल मीडियावरील आपल्या या फोटोला कॅप्शन देताना शार्पोव्हानं म्हटलं, आमच्या छोट्याशा कुटुंबाला सर्वांत सुंदर, आव्हानात्मक आणि छानशी भेट मिळाली आहे. आपल्या मुलाचं नामकरणंही तिनं केलं आहे. थेओदोर (Theodore) असं आपल्या मुलाचं नाव तिनं ठेवलंय. शार्पोवा आणि अलेक्झांडर हे रशियन-ब्रिटिश कपल असून त्यांनी सन २०२० मध्ये लग्न केलं तत्पूर्वी ते दोन वर्षे एकमेकांना डेटिंग करत होते.

थेओदोरचा जन्म १ जुलै २०२२ रोजी झाला असल्याचं तिनं इन्स्टावरील मेसेजमध्ये रोमन अंकामध्ये लिहिलं आहे. शारापोव्हाने ही बातमी शेअर करताच चाहत्यांनी या जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी कमेंट सेक्शनमध्ये धाव घेतली. रशियन टेनिस स्टारनं तिचा 35 वा वाढदिवस साजरा करताना एप्रिलमध्ये आपले गरोदरपणातील फोटो शेअर केले होते.

शार्पोव्हाचा पती अलेक्झांडर गिल्क्स कोण आहे?

अलेक्झांडर गिल्क्स हा मारिया शार्पोव्हाचा पती असून त्याच शिक्षण इटन कॉलेज आणि ब्रिस्टल विद्यापीठात झालं आहे. अलेक्झांडर व्हेंचर स्टुडिओ स्क्वेअर सर्कलचा सह-संस्थापक आहे. मे 2012 मध्ये मेघन मार्कलची मैत्रीण मिशा नूनूसोबत त्याचं लग्न झालं होतं, परंतु सन 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर सन २०१८ मध्ये मारिया शार्पोव्हासोबत त्याच डिटिंग सुरु झालं. पुढे सन २०२० मध्ये अलेक्झांडर आणि शार्पोव्हा यांनी लग्न केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here