VIDEO: माणसाच्या आकाराएवढा कासव पाहिलाय का? पाहा हा व्हिडीओ

या महाकाय कासवाचा व्हिडीओ New England Aquarium नावाच्या फेसबूक अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. आतापर्यंत

massive-sea-turtle-weighing-272-kg-gets-stuck-in-mudflat-people-from-three-organizations-carry-out-rescue-viral-video-update
massive-sea-turtle-weighing-272-kg-gets-stuck-in-mudflat-people-from-three-organizations-carry-out-rescue-viral-video-update

अमेरिकेतल्या मॅसेच्युसेट्सच्या समुद्रकिनारी कासवांच्या दुर्मिळ प्रजातीमधील एक महाकाय कासव नुकतंच सापडलं असून, सोशल मीडियाद्वारे जगभरात त्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. या कासवाचं वैशिष्ट्य म्हणजे तब्बल २७२ किलो वजनाचं कासव कुणीच पाहिलं नव्हतं. हा महाकाय कासव समुद्राच्या किनारी चिखलात अडकला होता. काही संस्थांनी पुढाकार घेत यशस्वीरित्या सुटका करत त्याला जीवनदान दिलंय.

सागरी परिक्षेत्रात ‘लेदरबॅक’ या जगातील सर्वात मोठ्या सागरी कासवाचं नुकतंच दर्शन झालं आहे. लेदरबॅक कासव हा खोल समुद्रात राहतो. त्याचे प्रमुख खाद्य जेलीफिश आहे. खरतर लेदरबॅक हा सर्वाधिक खोल सूर मारणाऱ्या प्राण्यांपैकी एक मनाला जातो. हा महाकाय कासव हेरिंग नदीच्या कडेला आल्यानंतर तिथल्या चिखलात फसला होता. त्याच्या वजनामुळे तो चिखलात अकडला आणि त्याचे पाय चिखलात फसले असल्याने त्याला समुद्रात परत जाणं शक्य झालं नाही आणि तो किनाऱ्यावरच अडकला.

https://www.facebook.com/NewEnglandAquarium/

 

स्थानिकांनी यासंदर्भात न्यू इंग्लंड एक्वैरियमच्या तज्ञांना माहिती दिल्यानंतर पशुवैद्यकांनी सुरूवातीला कासवाची तपासणी केली. पाच फूट इतक्या लांबीच्या कासवाचं आरोग्य तापसल्यानंतर त्याला चिखलातून बाहेर काढण्यासाठी प्राणी मित्रांनी धडपड सुरू केली.https://www.facebook.com/watch/?ref=external&v=1012592579533407

माणसाच्या आकाराएवढ्या या कासवाला सुरक्षितपणे समुद्रात हलवण्यासाठी तीन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. या कासवाचे वजन खूपच जास्त असल्याने त्याला किनाऱ्यावरून सरकता यावं यासाठी खास डिझाइन केलेली वाहतूक गाडी, स्ट्रेचर आणि मॅट वापरल्या. त्यानंतरही कासवाच्या अंगात फार ताकद उरली नव्हती.

बऱ्याच मेहनतीनंतर कासवाला समुद्रापर्यंत जाणं शक्य झालं आणि अखेर हा कासव समुद्रात गेला. त्यापूर्वी मत्स्यालयाच्या अँडरसन कॅबॉट सेंटर फॉर ओशन लाईफच्या संशोधक शास्त्रज्ञांनी कासवावर उपग्रह आणि ध्वनिक ट्रॅकिंग उपकरण बसवण्यात आले आहेत.

या महाकाय कासवाचा व्हिडीओ New England Aquarium नावाच्या फेसबूक अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून अनेकांनी तो लाईकही केला आहे. या महाकाय कासवाला पाहण्यासाठी लोकांनी देखील मोठी गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here