औरंगाबाद : एमआयएमला (AIMIM) महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे. एमआयएमचे सरचिटणीस मौलाना महेफूज उर रहेमान फारूकी (Maulana Mahfooz Ur Rehman) यांनी पक्षाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे पदाचा राजीनामा दिला. ते ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य आहेत. मौलाना महेफूज उर रहेमान फारूकी हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांचे जिल्ह्यासह राज्यात पक्ष वाढीसाठी मोठे योगदान आहे. मात्र, पक्षाच्या नेत्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे पक्षाला सोडचिठ्ठी दिली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओवेसी यांना पत्र लिहून आपल्या भावना कळविल्या आहे.
मौलाना महेफूज उर रहेमान फारूकी मर्कज उलूम ए-शरिया चे अमिर आहेत. तसेच दारूल उल नोमानीया जमैतून मोमीनात ट्रस्टचे अध्यक्ष, मुस्लिम नुमाईंदा कौन्सिलचे उपाध्यक्ष, ऑल इंडिया मुस्लिम मजलीस-ए-मुश्शवीरात चे सदस्य असून वर्ल्ड इस्लामिक फोरम लंडन च्या भारताचे सदस्य आहेत. यासह विविध पदावर ते कार्यरत असून त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मौलाना महेफूज उर रहेमान यांनी सुरुवातीपासून एमएमआयची पाळेमुळे वाढवण्यात मोठे योगदान आहे. विधानसभा, महापालिका,लोकसभा निवडणुकीत मोठे योगदान आहे. दांडगा जनसंपर्क असल्यामुळे त्याचा पक्षाच्या उमेदवारांना मोठा फायदा झाला होता.
मौलाना महेफूज उर रहेमान फारूकी यांचे काय आहे आरोप…
मौलाना महेफूज उर रहेमान फारूकी यांनी आरोप केले की त्यांनी पक्षासाठी मोठे योगदान दिले. त्यांनी कधीही पदाची लालसा केली नाही. किंवा कुटुंबातील सदस्यांसाठी काहीही मागितले नाही. स्वत: कोणतीही निवडणूक लढायची नाही. परंतु पक्षाचे इतर नेते त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होते. पक्षात योग्य तो सन्मान मिळत नव्हता. पक्षासाठी तन,मन,धनाने नेहमीच काम केले. कोणत्याही पदाची लालसा बाळगली नाही. परंतु पक्षाने दुर्लक्ष केले. याबाबतची तक्रार मे 2017, जून 2018, फेब्रुवारी 2020, 2022 मध्ये याबबती माहिती पक्ष पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना दिली होती. तसेच काही दिवसांपूर्वीच प्रत्यक्ष पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवेसी यांना प्रत्यक्ष माहिती दिली होती. असे पत्रात नमूद केले आहे.
प्रत्यक्ष भेटून गैरसमज दूर करु…मौलाना महेफूज उर रहेमान फारूकी हे पक्षाचे महत्वाचे नेते आहे. त्यांचा गैरसमज झाला आहे. मी पक्षाचा शहर अध्यक्ष या नात्याने त्यांना भेटून त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर तो दूर करु. त्यांचे पक्षासाठी मोठे योगदान आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.-शारेक नक्शबंदी, शहराध्यक्ष,एमआयएम.