Corona l औरंगाबादेत हॉटेल, रेस्टारंट, धाबे, रिसॉर्टमधील भोजन व्यवस्था ४ एप्रिलपर्यंत बंद

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

meals-in-hotels-restaurants-dhabas-and-resorts-in-aurangabad-district-will-be-completely-closed-till-april-4-news-updates
meals-in-hotels-restaurants-dhabas-and-resorts-in-aurangabad-district-will-be-completely-closed-till-april-4-news-updates

औरंगाबाद: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. संपूर्ण राज्य पुन्हा कडक लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या प्रमुख शहरांमध्ये मोठ्याप्रमाणवर कोरोनाबाधित आढळून येत असल्याने, स्थानिक प्रशासनाकडून निर्बंध अधिकच कडक केले जात आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी आज आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. meals-in-hotels-restaurants-dhabas-and-resorts-in-aurangabad-district-will-be-completely-closed-till-april-4-news-updates

औरंगाबाद जिल्ह्यातील रेस्टॉरंट, हॉटेल, परमीट रूम, नाश्ता सेंटर, धाबे, फूड पार्क, फन पार्क, रिसॉर्ट मधील डायनींग सुविधा (आसनावर बसून खाने) १७ मार्च सायंकाळी ६ पासून ते ४ एप्रिलपर्यंत पूर्णतः बंद करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत दिली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की,  जिल्ह्यात व शहर ग्रामीण भागात पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अंशत: लॉकडाउनबाबत तपासणी दौरा केला होता. या दरम्यान डायनिंग व रेस्टॉरंट, हॉटेल, परमीट रूम, नाष्टा सेंटर, ढाबे आदी ठिकाणी मोठी गर्दी होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. 

कोविड-19 प्रतिबंधक कार्यवाहीस ही बाब बाधा निर्माण करत असल्याने, याकरिता उपाययोजना म्हणून डायनिंग व रेस्टॉरंट, हॉटेल, परमीट रूम, नाष्टा सेंटर, ढाबे, फूड पार्क, रिसॉर्टमधील डायनिंग सुविधा आसनावर (बसून खाणे) पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केवळ पार्सल सुविधा, टेक अवे किंवा घरपोच सुविधा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. जेणेकरून गर्दीस प्रतिबंध करता येणार आहे. बुधवार १७ मार्च सकाळी ६ वाजेपासून ते ४ एप्रिल २०२१ पर्यंत हा आदेश लागू असणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

वेरुळ, अजिंठ्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळे ४ एप्रिलपर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी संयुक्तपणे दिले आहेत. तसेच अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी २० पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये असे नव्याने घातलेल्या निर्बंधात म्हटले आहे.

औरंगाबाद शहरात गुरुवारपासून अशंत: टाळेबंदी लागू करण्यात आली असून सायंकाळी ९ वाजेपासून सर्व दुकाने बंद करण्याचे निर्देश तीन दिवसापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्या आदेशात दुरुस्ती करुन पर्यटनस्थळे, किल्ले, स्मारके, संग्रहालये बंद करण्याच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. दुकाने सुरू ठेवण्यासाठी चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. तर, यापूर्वीच शहरातील विवाहसमारंभ, सभा, आंदोलने, शाळा, महाविद्याालये, विद्यापीठातील अध्ययन-अध्यापन बंद करण्यात आले आहे.

जिल्ह्यात काल 1023 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद जिल्ह्यात काल 364 जणांना (मनपा 309, ग्रामीण 55 ) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत  51381  कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण  1023 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 57701 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1339 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4981 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

‍मनपा (793)

नारळीबाग ( 1), घाटी (3), श्रेय नगर (8), जिल्हा रुग्णालय (1), उत्तरानगरी (2), बजरंग चौक (4), म्हाडा कॉलनी (11), बीड बायपास (21), गारखेडा (6), तापडिया नगर (2), एन 1 (4), एन 2 (7), एन 3 (3),  एन 4 (4), एन 5 सिडको (6), एन 6 (11), एन 7 (5), एन 8 (6), एन 9 (5), एन 11 (6),  एन 12 (8),  सेव्हन हिल (2), टाऊन सेंटर (2), विद्यानगर (3), राजेश नगर बीड बायपास (1), त्रिमुर्ती चौक (2), शिवाजीनगर (4), एन 11 (4), बायजीपुरा (2),जाधववाडी (11), सफलनगर (1), मिलिट्री हॉस्पीटल (1), मयुरपार्क (7),  श्रीकृष्ण नगर (1), भाग्यनगर (2), वसंत नगर (1), सुदर्शन नगर (1), सिंधी कॉलनी (2),  व्यंकटेश नगर (2), रामपुरी (1), मेहेर नगर (3), सुराणा नगर (1), कांचनवाडी (6), एमजीएम परिसर (3), रोकडा हनुमान कॉलनी (4), उल्कानगरी (9), एन 1 (1), नक्षत्रवाडी (3), क्रांती नगर (2), सिल्क मिल कॉलनी (2), एकनाथ नगर (1), जयभवानी नगर (1), रविंद्र नगर (1), बन्सीलाल नगर (12), क्रांती चौक (2),  पडेगांव (10), दशमेश नगर (1), स्नेह नगर (1), भगतसिंग नगर (2), ज्योती नगर (6), वंदन नगर (1), समता नगर(3), सातारा परिसर (3), बागला नगर (1), सिडको (2), मिटमिटा (3), प्रताप नगर (7), केसरी बाजार रोड (1), वेदांत कॉलनी (1), तिरुपती हॉटेल (3), समर्थ नगर (4),  देवगिरी कॉलनी (1),  ईटखेडा (5), चाणक्यपुरी (1), जय विष्णू भारती कॉलनी (1), कुंभारवाडा (1), गुलमंडी (3), बालाजी नगर (7), एसटी कॉलनी (2), गांधी  नगर (2), टिव्ही सेंटर (2), शिवशंकर कॉलनी (2),  अरिहंत नगर (1), उत्तम नगर (1), न्यु हनुमान नगर (3), संजय नगर (1), उस्मानपुरा (6), माजी सैनिक कॉलनी (1), पुंडलिक नगर (3), माया नगर (1), नारेगाव (6), न्याय नगर (3), आयोध्या नगर (2), जयभवानी नगर (8), चिकलठाणा (8), संभाजी कॉलनी (1), जवाहर कॉलनी (4), मुकुंदवाडी (14), रामनगर (9), वानखेडे नगर (1), अंबिका नगर हर्सुल (3), प्रकाश नगर (1), लघुवेतन कॉलनी (2), विवेकानंद नगर (2), मिलिंद नगर (1), टाऊन सेंटर (3), संजय नगर बायजीपुरा (2), ठाकरे  नगर (6), नैवेद्य हॉटेल (1), प्रकाश नगर (1), विष्णू नगर (1), उच्च न्यायालय परिसर (1), औरंगपुरा (5), राजाबाजार (2), एसपीआय हॉस्टेल, हडको (11), हिमायतबाग (4), काबरा नगर, गारखेडा (2), सुधाकर नगर (1), कासलीवाल मार्व्हल (1), श्रीकृष्ण नगर (1), कैलास नगर (4), दर्गा रोड (2), जालान नगर (1), पद्मपुरा (3), नंदनवन कॉलनी (1), गोल्डनसिटी (1), दिशा संस्कृती (3), नारळीबाग (2), पहाडसिंगपुरा (2), दीपनगर (2),  विश्रामबाग कॉलनी (1), रेल्वे स्टेशन परिसर (1), नागेश्वरवाडी (2),विद्यानिकेतन कॉलनी (2), मारीया हॉस्पीटल (1), सादात नगर(1), कासलीवाल तारांगण (2), होनाजी नगर (2), पोलिस कॉलनी (2), सराफा कॉलनी (1), दिशा नगरी (1), पांढरी बाग (2), समाधान कॉलनी (1), सन्मित्र कॉलनी (2), निराला बाजार (1), भीम नगर (1), जालना रोड (2),खाराकुवा (1), विजय नगर (1), भारतमाता मंदिर (1), रेणुका नगर (1), चिश्तिया कॉलनी (1), स्वामी समर्थ नगर (1), गादीया विहार (2), वेदांत नगर (1), न्यु गणेश नगर (1), भगत नगर (3), राजे संभाजी कॉलनी (1), संकल्प नगर (1), एकता नगर (1), सुरेवाडी (3), सुराणा नगर (2),टिळक नगर (1), गजानन कॉलनी (5), आकाशवाणी (1), भानुदास नगर (1), शंभु नगर (1),रविंद्र नगर (1), राजनगर (3), खिवंसरा पार्क (1), नाथ नगर (1), विष्णू नगर (1), ज्ञानेश्वर नगर (1), सारंग सोसायटी (1), स्टेशन रोड (3), शहानुरवाडी (1), समता नगर (1), झांबड इस्टेट (1), पैठण गेट (1), छावणी (1), शक्तीनगर (1), न्यु शांती निकेतन कॉलनी (1), मयुरबन कॉलनी (1), मकसुद कॉलनी (1),

अन्य (204)                                                                                    

ग्रामीण (230)

गंगापूर (2), बजाज नगर (43), आडुळ (1), वरुड काजी (1), फुलंब्री (2), रांजण गांव (1), शेंद्रा एमआयडीसी (3), पिसादेवी (1), मिसारवाडी (3), वाळुज (3), तिसगाव (2), कुंभेफळ (1), सावंगी (1), वडगांव कोल्हाटी (4), सिडको महानगर (8), पंढरपुर (1), वरुड काझी (1), सिल्लोड (1),बिडकीन (1), वाळुज (1), 

अन्य (149)                                                                                  

मृत्यू (5)

    घाटी

  1. पुरूष- वय 39 – पत्ता- गंगापुर
  2. पुरूष- वय 57 – पत्ता- गारखेडा,औरंगाबाद
  3. स्त्री- वय 65 – पत्ता- कंकवटी नगर, कन्नड
  4. पुरूष – वय 55 – पत्ता- साईनगर,एन 6 , सिडको
  5. पुरूष – वय 71 – पत्ता- आळंद ता. फुलंब्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here