MHT CET-2020 : एमएचटी-सीईटी परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर

mht-cet-2020-exams-announced-revised-dates)
mht-cet-2020-exams-announced-revised-dates)

मुंबई : एमएचटी-सीईटी २०२० परीक्षेच्या सुधारित तारखा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. (mht-cet-2020-exams-announced-revised-dates) परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक आणि प्रवेशपत्र सेलच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.

सुप्रीम कोर्टानं सीईटी घेण्यास अधिकृत परवानगी दिल्यानंतर आणि उच्च आणि तांत्रिक शिक्षण विभागाच्या सीईटी सेलनं परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत.

या आहेत सुधारित तारखा

पीसीबी ग्रुप – १, २, ४, ५, ६, ७, ८, ९ ऑक्टोबर २०२०
पीसीएम ग्रुप – १२, १३, १४, १५, १६, १९, २० ऑक्टोबर २०२०

परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक हे सेलच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असून प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना या वेबसाईटवरुन डाऊनलोड करता येणार आहे. उमेदवारांनी परीक्षेसंदर्भातील ताज्या अपडेट आणि सूचना जाणून घेण्यासाठी www.mahacet.org या वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन सेलकडून करण्यात आले आहे.

महाराष्ट्र सरकारच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या MHT-CET अर्थात अभियांत्रिकी प्रवेश पूर्व परीक्षेसंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली होती. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर MHT-CET परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here