“हिंदू धर्माचा ठेका कोणा एकाकडे नाही”; एमआयएम-शिवसेनेत जुंपली

राज्य सरकारकडून धार्मिक स्थळं उघडण्याला परवानगी नाही

mim -mp-imtiyaz-jaleel-slams-shiv-sena ex mp chandrakant-khaire-temple- issue
mim -mp-imtiyaz-jaleel-slams-shiv-sena ex mp chandrakant-khaire-temple- issue

औरंगाबाद : मंदिरं आणि धार्मिक स्थळं उघडण्यावरुन एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात शाब्दीक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं. “हिंदू धर्माचा ठेका कोणा एकाकडे नाही आणि हिंदू मंदिरं तसंच धर्माला कोणीही आपली मक्तेदारी समजू नये,” असं एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील खैरे यांना म्हणाले.

इम्तियाज जलील यांनी मंदिरं उघडण्यासाठी आदोलन करण्याचा इशारा दिला होता. पोलीस आयुक्त यांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर एमआयएमने आंदोलन मागे घेतले. परंतु गणरायाच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या विनंतीनंतर आंदोलन करण्याचा निर्णय मागे घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

“मी इथेच उभा आहे. मंदिर कसं उघडतं ते पाहू. मंदिरं उघडण्यासाठी आम्ही समर्थ आहोत,” असं शिवसेचे खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले होते. त्यावर जलील यांनी उत्तर दिलं. “हिंदू धर्माचा ठेका कोणा एकाकडे नाही. मंदिरं आणि हिंदू धर्माला कोणाही आपली मक्तेदारी समजू नये. ज्यांना धर्माच्या नावानं राजकारण करायचं असतं तेच असा वाद घालत असतात,” असं म्हणत इम्तियाज जलील यांनी खैरे यांच्यावर निशाणा साधला.

मी मंदिरात गेलो तरी मंदिराचं पावित्र्य राखणारइम्तियाज जलील

“मी जनतेचा खासदार आहे आणि मी जनतेचे प्रश्न सोडवणार. मंदिरात गेलो तरी मी मंदिराचं पावित्र्य राखणार. माझ्यासोबत त्या ठिकाणी हिंदू बांधवही असतील,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मंदिरं उघडा हे सांगणारे इम्तियाज जलील कोण आहेत? चंद्राकांत खैरे

शिवसेनेनं हिंदुत्वाची भूमिका सोडली असल्याचं त्यांना दाखवायचं असून शिवसेनेला बदनाम करण्याचा त्यांचा डाव असल्याचे चंद्राकांत खैरे म्हणाले. “दोन दिवसांनंतरही मी मंदिरासमोर उभा राहिन. तुम्ही येऊन दाखवा. मी याच ठिकाणी उभा आहे. मंदिर कसं उघडतं ते पाहूच. आम्ही मंदिरं उघडण्यासाटी समर्थ आहोत. मंदिरं उघडा हे सांगणारे इम्तियाज जलील कोण आहेत? हे सर्व राजकारण असून त्यांना राजकारण करायचं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here