कृषीमंत्री अब्दुल सत्तारांकडून सुप्रिया सुळेंना मुलाखतीदरम्यान शिवीगाळ; Video झाला Viral

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त,राज्यभर सत्तारांच्याविरोधात आंदोलन

Minister-abdul-sattar-abused-ncp-leader-supriya-sule-in-front-of-camera-video-goes-viral-news-update-today
Minister-abdul-sattar-abused-ncp-leader-supriya-sule-in-front-of-camera-video-goes-viral-news-update-today

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रीमंडळातील नेते अब्दुल सत्तार (Abul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवी दिल्याचा धक्कादायक प्रकार एका मुलाखतीमध्ये घडला आहे. लोकशाही वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर सत्तार यांना प्रश्न विचारला असता सत्तार यांनी थेट सुप्रिया सुळेंना कॅमेरासमोरच शिवी घातल्याचं दिसून आलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या विधानासंदर्भात संताप व्यक्त केला आहे. सत्तारांच्या शिवीगाळनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राज्यभर संतप्त आंदोलन करत आहेत. मुंबई येथील सत्तारांच्या बंगल्याचे काचा फोडल्या आहे.

औरंगाबादमध्ये ‘लोकशाही’ वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधिंशी बोलताना सत्तार यांना सुप्रिया सुळेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं म्हटलं आहे. यावर काय सांगाल असं सत्तार यांना विचारण्यात आलं. या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी घातली. “इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ,” असं उत्तर सत्तार यांनी दिलं.

सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे यांच्या नावाने असलेल्या ट्वीटर हॅण्डलवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. “या महिलाविरोधी नेत्यांकडून सुप्रियाबद्दल आणि पर्यायाने सर्व महिलांबद्दल वादग्रस्त विधाने सुरुच आहे. पुरुषार्थ सांगणारे हे लोक त्यांच्या वर्तुवणुकीमुळे आणि क्षमतेमुळे उघडे पडले आहेत,” असं सदानंद सुळे यांच्या नावाने असलेल्या अकाऊंटवरुन ट्वीट करण्यात आलं आहे. हे अकाऊंट व्हेरिफाइड नाही.

 आधी स्वयंपाकघरात जा किंवा इतर कुठेतरी असं म्हटलं गेलं आणि आता कॅबिनेटमध्ये असलेल्या मंत्र्याने केलेलं हे विधान केलं आहे. ही लोक स्वत:ला लोकप्रतिनिधी म्हणतात आणि हे नव्या पुढारलेल्या सरकारने नेते आहेत, असंही अन्य एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे. स्वत:बद्दल सोडून त्यांना इतरांबद्दल आणि महिलांबद्दल काहीही वाटत नाही. सुप्रिया चांगलं काम करत राहा. तुला अधिक शक्ती मिळो. अशा नेत्यांची विचारसणी उघडी पाडणारी महिलाच खरं नेतृत्व असते,” असंही सदानंद सुळेंच्या नावाने असलेल्या या खात्यावरुन केलेल्या तिसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलंय.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here