शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण

MLA Pratap Sarnaik Protection from arrest by the Supreme Court
MLA Pratap Sarnaik Protection from arrest by the Supreme Court

मुंबई l शिवसेना Shivsena आमदार प्रताप सरनाईक MLA Pratap Sarnaik यांना सर्वोच्च न्यायालयाने supreme court दिलासा दिला आहे. टॉप ग्रुप सिक्युरिटी एमएमआरडीए आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने ED 24 नोव्हेंबरला प्रताप सरनाईकांसह मुलगा विहंग सरनाईक यांच्या घरावर छापेमारी केली होती. याप्रकरणी प्रताप सरनाईक यांनी सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण दिले आहे.

सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या आदेशानुसार, प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांवर कुठलीही कारवाई करु नये, असे आदेश दिले आहेत. ईडी सरनाईक कुटुंबाला चौकशीसाठी बोलवू शकते. मात्र त्यांना अटक करु शकत नाही, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान प्रताप सरनाईक यांनी काल (8 डिसेंबर) सहकुटुंब मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. याचे व्हिडीओ आणि फोटोही व्हायरल झाले होते. यानंतर आज सर्वोच्च न्यायलयाचा निर्णय आल्याने सरनाईकांना बाप्पा पावला असे बोललं जातं आहे.

नेमकं काय आहे प्रकरणं ?

ईडीने मंगळवारी 24 नोव्हेंबर प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. प्रताप सरनाईक यांनाही नोटीस बजावून ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, आपण परदेशातून आल्याने आठ दिवस आपल्याला सक्तीने क्वॉरंटाईन राहावं लागत आहे.

हेही वाचा l Maratha reservation l आज घटनापीठासमोर महत्त्वपूर्ण सुनावणी

शिवाय विहंगची पत्नीही आजारी आहे. त्यामुळे मला चौकशीला उपस्थित राहता येणार नाही, असं सरनाईक यांनी ईडीला कळवलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे सरनाईक आज ईडीसमोर चौकशीला हजर राहणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. सरनाईक यांनी ईडीला पुढच्या आठवड्यात चौकशी करण्याची विनंती केली असली तरी अजून त्यावर ईडीने काही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे ईडी काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा गोबेल्सचे बाप भाजपच्या सायबर फौजांचे सेनापती, तरीही शेतकरी आंदोलन थांबवता आले नाही

ईडीने सरनाईक यांच्या घर, कार्यालय आणि हॉटेलसह 10 ठिकाणांवर छापे मारले होते. त्यावेळी सरनाईक मुंबईत नव्हते. ते भारताबाहेर होते. मात्र, ईडीचे छापे पडल्याचं कळताच ते भारतात आले आणि त्यांनी तडक प्रभादेवीतील ‘सामना’ कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली.

हेही वाचा : Vj chitra l अभिनेत्रीची हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

तब्बल दीड तास या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर बोलताना ईडीने कारवाई का केली? कशासाठी केली? याची काहीच कल्पना नसल्याचं सरनाईक यांनी सांगितलं होतं. 

हेही वाचा l Moto G9 Power स्मार्टफोन झाला लाँच, पाहा खास फिचर्स आणि किंमत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here