मुंबई‘फिल्मसिटी’कारस्थानाविरोधात मनसे शिवसेनेचे हातात हात

अमेय खोपकर यांचा ट्विटवरून इशारा

mns-prakash-mahajan-on-dasara-melava-of-shivsena-uddhav-thackeray-eknath-shinde-group-news-update
mns-prakash-mahajan-on-dasara-melava-of-shivsena-uddhav-thackeray-eknath-shinde-group-news-update

बॉलिवूडला इतरत्र हलवलं जाण्याचा कट आहे असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही केला होता. त्यानंतर मनसेने या प्रकरणात उडी घेतली आहे. जाणीवपूर्वक बॉलिवूडला बदनाम करण्याचा डाव रचला जातोय. एवढंच नाही तर फिल्मसिटीच मुंबईबाहेर हलवण्याचं कुटील कारस्थान रचलं जातं आहे असा आरोप मनसेने MNS केला आहे.   

बॉलिवूडमधल्या कलाकारांना भूतकाळातही गंभीर गुन्ह्यांखाली अटक झाली. त्यांना शिक्षा झाल्या पण म्हणून कुणी बॉलिवूडलाच खलनायक ठरवलं नाही. आता मात्र जाणीवपूर्वक बॉलिवूडला बदनाम करण्याचा डाव रचला जातोय. एवढंच नाही तर फिल्मसिटीच मुंबईबाहेर हलवण्याचं कुटील कारस्थान रचलं जातं आहे असा आरोप मनसेने MNS केला आहे. मनसेचे चित्रपटसेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी याबाबत ट्विट करत भूमिका मांडली आहे.

वाचा l महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीबाबत सुप्रीम कोर्टानेे दिला ‘हा’ निकाल

या ट्विटमुळे कधी नव्हे तो मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सुरात सूर मिसळला आहे. बॉलिवूडला इतरत्र हलवलं जाण्याचा कट आहे असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही केला होता.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे
“बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत, ते कधीही सहन केले जाणार नाहीत,” असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापासून बॉलिवूडमधील कलाकारांवर आरोप केले जात आहे. ड्रग्ज प्रकरणात अनेक कलाकारांची नावं घेतली जात आहे.

वाचा l“भारतापेक्षा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान बरे”; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

बॉलिवूडमधील या वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी इशारा दिला आहे. बॉलिवूडवर केल्या जात असलेल्या आरोपांवर दुःख व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशात योगी सरकारने फिल्मिसिट उभारण्याबाबत भूमिका घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here