मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण!

mns-chief-raj-thackeray-mother-corona-positive-quarantine-at-krushnakun-news-update
mns-chief-raj-thackeray-mother-corona-positive-quarantine-at-krushnakun-news-update

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची (Covid positive) लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. राज ठाकरेंना बरं वाटत नसल्यामुळे आज होणारा मनसे कार्यकर्ता मेळावा पुढे ढकलण्यात आला होता. मात्र, आता राज ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

राज ठाकरेंना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत होती. त्यांनी आणि त्यांच्या मातोश्रींनी करोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र, त्यानंतर देखील त्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं आहे.

पालिकेकडून राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजवर सॅनिटायझेशन केलं जाण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर घरीच क्वारंटाईन होऊन उपचार केले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here