Shivsena Dasara Melava : “सेनेच्या ‘टोमणे मेळाव्या’ला मनपाने परवानगी द्यावी, महाराष्ट्राला मनोरंजनापासून वंचित ठेवू नये”

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर मनसेची सडकून टीका केली आहे.

mns-gajanan-kale-on-shivsena-uddhav-thackeray-dasara-melava-shivaji-park-shivtirth-news-update-today
mns-gajanan-kale-on-shivsena-uddhav-thackeray-dasara-melava-shivaji-park-shivtirth-news-update-today

मुंबई : शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये दसरा मेळाव्याच्या जागेवरून वाद सुरु असताना मनसेने त्यात उडी घेतली आहे. मनसे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर सडकून टीका केली आहे. ‘टोमणे मेळावा’ म्हणत त्यांनी शिवसेना आणि पर्यायाने उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) डिवचलं आहे. “मुंबई मनपा आणि राज्य सरकारने शिल्लकसेनेला शिवतीर्थावर ‘टोमणे मेळावा’साठी परवानगी देवून टाकावी.

खंजीर, मर्द, मावळा, वाघनखं, गद्दार, निष्ठा यातून होणाऱ्या मनोरंजनापासून महाराष्ट्राला वंचित ठेवू नये.तसंही यावेळची स्क्रिप्ट बारामती वरूनच येणार आहे. अबू आझमी आणि असदुद्दीन ओवेसी स्टेजवर असणार आहेत का?”, असं गजानन काळे म्हणाले आहेत.

मुंबई मनपा व राज्यसरकारने शिल्लक सेनेला शिवतीर्थावर ”टोमणे मेळावा” साठी परवानगी देवून टाकावी. आणि खंजीर, मर्द, मावळा, वाघनखं, गद्दार, निष्ठा यातून होणाऱ्या मनोरंजनापासून महाराष्ट्राला वंचित ठेवू नये. तसेही यावेळची स्क्रिप्ट बारामती वरून येणार आहे. अबू आझमी व ओवेसी स्टेजवर असणार आहेत का ?

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here