Amazon l अ‍ॅमेझॉनकडून राज ठाकरेंची माफी!

mns-leader-akhil-chitre-says-amazon-aplogise-to-mns president-raj-thackeray
mns-leader-akhil-chitre-says-amazon-aplogise-to-mns president-raj-thackeray

मुंबई l अ‍ॅमेझॉनने आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करण्याचं आश्वासन दिलं असल्याची माहिती मनसे नेते अखिल चित्रे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. अ‍ॅमेझॉनकडून Amazon राज ठाकरेंची Raj thackeray दिलगिरी व्यक्त केल्याचा दावाही अखिल चित्रे Akhil chitre यांनी केला आहे. मराठीच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अ‍ॅमेझॉन बॅकफूटवर गेलं आहे.  

 ज्याप्रकारे त्यांनी आपल्या वेब पेजवर किंवा मोबाइल अ‍ॅपवर भाषा निवडताना मराठी लवकरच आणत आहोत आणि आपण क्षमस्व आहोत असं त्यांनी टाकलं आहे. मराठीद्वेष दाखवला तेव्हाच आम्ही मनसैनिक अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार असं सांगितलं होतं. त्याचप्रकारे शुक्रवारी काही फटाके फुटले आणि अ‍ॅमेझॉन प्रशासन खडबडून जागं झालं,” असं अखिल चित्रे यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, “राज ठाकरे, आमचे सचिव, पदाधिकारी यांना नोटीस पाठवल्यानंतर माफी मागावी अशी आमची पहिली अट होती. त्यानुसार त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. ५ तारखेला सर्व केसेस ते रद्द करणार आहेत”.

मनसेकडून राज्यभरात तोडफोड
मराठीच्या मुद्द्यावरुन मनसे प्रचंड आक्रमक झाली असून राज्यभरात अ‍ॅमेझॉनची कार्यालयं फोडली. मनसे कार्यकर्त्यांनी पुणे, मुंबई आणि वसईमधील अ‍ॅमेझॉनच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. ‘मराठी नाय तर अ‍ॅमेझॉन नाय’ अशी घोषणाबाजी मनसैनिकांकडून करण्यात आली.

राज ठाकरेंना नोटीस
मनसेने सुरु केलेल्या मराठी भाषेच्या मोहिमेविरोधात अ‍ॅमेझॉनने कोर्टात धाव घेतली. यानंतर दिंडोशी कोर्टाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली. कोर्टाने राज ठाकरे आणि काही मनसे सचिवांना ५ जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला.

न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर मनसेने आपण भूमिकेवर ठाम राहणार असल्याचं सांगताना यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा अ‍ॅमेझॉनला दिला होता. राज ठाकरेंना नोटीस पाठवणाऱ्या अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार अशी प्रतिक्रिया अखिल चित्रे यांनी दिली होती.

हा आहे वाद 
अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी मनसेने मोहीम सुरु केली होती. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी सात दिवसांत मराठी भाषेत अॅप सुरू करावं, अन्यथा दिवाळी मनसे स्टाईलने होईल असा इशा मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिला होता.

यासाठी त्यांनी कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन भेटही दिली होती. याशिवाय ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ असा मजकूर लिहिलेले बॅनर वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी परिसरात लावण्यात आले होते.

विशेष म्हणजे मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या मागणीची अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या प्रतिनिधींनी दखल घेतली होती. जेफ बेझॉस यांना तुमचा ईमेल मिळाला आहे.

अ‍ॅमेझॉन अ‍ॅपबाबत तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित टीमला आम्ही याची माहिती दिल्याचा ई-मेल अ‍ॅमेझॉनकडून पाठवण्यात आला होता. त्यानंतर अ‍ॅमेझॉनचं शिष्टमंडळ मुंबईत आलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here