राज ठाकरेंना नोटीस पाठवणाऱ्या अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार;मनसेचा इशारा

mns-president-akhil-chitre-warns-amazon-after-court-notice-to-raj-thackeray
mns-president-akhil-chitre-warns-amazon-after-court-notice-to-raj-thackeray

मुंबई l मनसे अध्यक्ष राज ठाकरे MNS Raj thackeray यांना दिंडोशी न्यायालयाने नोटीस Court-notice पाठवली. अ‍ॅमेझॉनसोबतचा amazon वाद चिघळला आहे. न्यायालयाने राज ठाकरेंना नोटीस पाठवणाऱ्या अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार असा इशारा मनसे नेते अखिल चित्रे akhil-chitre यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.

मनसेने सुरु केलेल्या मराठी भाषेच्या मोहिमेविरोधात अ‍ॅमेझॉनने कोर्टात धाव घेतली आहे. यानंतर दिंडोशी कोर्टाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. कोर्टाने राज ठाकरे आणि काही मनसे सचिवांना ५ जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. राज ठाकरेंना नोटीस पाठवल्यानंतर मनसे नेते अखिल चित्रे यांनी प्रतिक्रिया दिली.

यावेळी ते म्हणाले की, “मनसे आपल्या भूमिकेवर ठाम आहे. अ‍ॅमेझॉनला महाराष्ट्रात व्यवसाय करु देत आहे हे विसरता कामा नये. अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार हे नक्की आहे. पुढे ते म्हणाले की, “खटले दाखल करण्याचा प्रयोग त्यांनी सुरु केला आहे.

हेही वाचा : केंद्र सरकारने 10 टक्के वाढीची पिपाणी वाजवून जिंकल्याचा आव आणू नये;शिवसेनेची टीका

१९ तारखेला माझ्याविरोधात केस टाकली होती. आता राज ठाकरेंना नोटीस पाठवण्याचं दुसाहस त्यांनी केलं आहे. याची किंमत त्यांना मोजावी लागणार आहे. अशा फालतू नोटीसला आम्ही फार किंमत देत नाही. मराठीसाठी कोणत्याही केसेस अंगावर घेण्याची तयार आहोत हे अ‍ॅमेझॉनने लक्षात ठेवावं”.

काय आहे वाद
मनसेने अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी मोहीम सुरु केली होती. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी सात दिवसांत मराठी भाषेत अॅप सुरू करावं, अन्यथा दिवाळी मनसे स्टाईलने होईल असा इशा मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिला होता.

हेही वाचा : साखरसम्राट रत्नाकर गुट्टेंना ईडीचा दणका; २५५ कोटींची मालमत्ता जप्त

यासाठी त्यांनी कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन भेटही दिली होती. याशिवाय ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ असा मजकूर लिहिलेले बॅनर वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी परिसरात लावण्यात आले होते.

हेही वाचा : लक्ष्मीदर्शनावरुन तीन पक्षांची मारामारी?; आशिष शेलारांचा महाआघाडीवर निशाणा

विशेष म्हणजे मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या मागणीची अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या प्रतिनिधींनी दखल घेतली होती. जेफ बेझॉस यांना तुमचा ईमेल मिळाला आहे.

अ‍ॅमेझॉन अ‍ॅपबाबत तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित टीमला आम्ही याची माहिती दिल्याचा ई-मेल अ‍ॅमेझॉनकडून पाठवण्यात आला होता. त्यानंतर अ‍ॅमेझॉनचं शिष्टमंडळ मुंबईत आलं होतं.

यह भी पढ़ें : मोहन भागवत खिलाफ हो जाएं तो मोदी सरकार उनको भी आतंकी बता देगी; राहुल गांधी का हमला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here