मुंबईः राज ठाकरे Raj Thackeray जेंनझींच्या आंदोलनावर बोलताना दिसले. यादरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Naredra Modi यांच्या कालच्या व्हिडीओ बोलताना दिसले. राज ठाकरे यांनी म्हटले की, मी पंतप्रधानांचं नवीन व्हिडिओ पाहिला. त्यात त्यांनी सांगतिलं की, ज्या प्रकारचे व्हिडिओ आणि भाषा वापरली ती अयोग्य आहे. मला मान्य आहे. कुणाच्याही बाबत अशा प्रकारची खालच्या थराची भाषा वापरली जाऊ नये. मला मान्य आहे. पंतप्रधानांना सांगायचं तुमच्या पक्षातील लोकांनाही सांगा. महात्मा गांधी, नेहरू आणि इंदिरा गांधीपासून आमच्यापर्यंत तुमची ट्रोल करणारी लोक प्रत्येक राज्यात बसले आहेत. ते कोणत्या भाषेत बोलत आहे. पंतप्रधानांनी सांगावं तेही बंद करा. गेल्या 12 वर्षातच सुरू झालं. भाजपच्या ट्रोल टीमने सुरू केलं त्यातूनच हे उगवलं.
तेच तुमच्या अंगाशी आलं. मोदी म्हणाले, मला शिव्या दिल्या. आईला शिव्या दिला. चुकीचं आहे. मनापासून सांगतो. पंतप्रधानांना सांगतो दुसऱ्यांनाही आया असतात. तुमच्या पक्षातील लोकांना सांगा. तुम्हीही मर्यादा पाळा. नरेंद्र मोदी म्हणतात त्या मुलांना माफ केलं. पण 12 वर्ष तुमच्या लोकांनी जे केलं त्याची माफी कोण मागणार. जंतरमंतरवर डोकी फोडली.

















































































































































