नवी दिल्ली l केंद्र सरकारने Central Governments आज (मंगळवार) पुन्हा एकदा चीनवर डिजिटल स्ट्राईक digital strike on china केलं आहे. कारण आता पुन्हा एकदा केंद्र सरकारने ४३ मोबाइल Ban on 43 china mobile apps अॅप्सवर बंदी घातली आहे.
माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६९ अ अंतर्गत ४३ मोबाइल अॅप्सवर भारतात प्रतिबंधित करीत आहेत. असं सरकारने म्हटले आहे. भारताच्या सार्वभौमत्व, अखंडता, संरक्षण, सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी हानिकारक असलेल्या मोबाइल अॅप्सविरूद्ध ही कारवाई करण्यात आली आहे.
ह्या अँपवर बंदी

भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आज माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६९ अ अंतर्गत ४३ मोबाइल अॅप्सवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे.
हेही वाचा l कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्रात टास्क फोर्स
या अॅप्सच्या इनपुटच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेसाठी, भारताची सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेस धोका असल्याचे निदर्शनास आल्यानंतर या अॅप्सवर बंदी घातली गेली आहे.
हेही वाचा l सत्ता मिळत नाही म्हणून प्रताप सरनाईकांवर ईडीची कारवाई : शरद पवार
सरकारने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने भारतीय सायबर गुन्हेगारी समन्वय केंद्र मंत्रालय, गृह मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या विस्तृत अहवालाच्या आधारे भारतातील यूजर्ससाठी या अॅप्सचा प्रवेश रोखण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.




















































































































































































