West Bengal Election l अभिनेते मिथुन चक्रवर्तीला भाजपचे साकडे; मोहन भागवतांनी घरी जाऊन घेतली भेट

अभिनेते मिथुन चक्रवर्ती तृणमूल काँग्रेसचे माजी राज्यसभा सदस्य

mohan-bhagwat-visits-mithun-chakraborty-ahead-of-west-bengal-elections
mohan-bhagwat-visits-mithun-chakraborty-ahead-of-west-bengal-elections

मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत Mohan-bhagwat यांनी आज अचानक अभिनेते मिथुन चक्रवर्ती Mithun-chakraborty यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास दीड तासांपेक्षा अधिक काळ चर्चा झाली. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या West Bengal Election पार्श्वभूमीवर ही भेट होती. मिथुनला भाजपात आणण्यासाठी साकडे घातले जात आहे. अशी माहिती समोर आली आहे.

पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भागवत यांनी मिथुन यांची भेट घेतल्यानं मिथुन भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. भाजपने सर्व शक्ती पणाला लावली असून तृणमूलचे डझनभर नेते भाजपने आतापर्यंत फोडले आहे. ममत बॅनर्जीला हटवण्यासाठी भाजप जुळवाजुळव करत आहे.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असून, त्यामुळे भाजपा आणि तृणमूल यांच्या राजकीय संघर्ष वाढला आहे. दोन्ही पक्षात जोरदार कलगीतुरा बघायला मिळत असतानाच आज सरसंघचालक मोहन भागवत यांनी सकाळी सव्वानऊ वाजताच्या मिथुन चक्रवर्ती यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्यानं महत्त्वाची मानली जात आहे.

भागवत यांच्यासोबतची भेट कौटुबिक होती

भागवत यांच्यासोबतची भेट कौटुबिक होती. खूप दिवसांपासून आम्हाला भेटायचं होतं. पण कार्यक्रमामुळे भेटता येत नव्हतं. भागवत यांनी आज माझ्या घरी नाश्ता केला. त्याचबरोबर मलाही सहकुटुंब नागपूरला बोलावलं आहे,” असं म्हणत मिथुन यांनी राजकीय चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

मिथुन यांचा २०१६ मध्ये राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा

२०११ मध्ये मिथुन यांनी ममता बॅनर्जी यांच्या विनंतीवरून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तृणमूलने त्यांना राज्यसभेवर पाठवल होतं. मात्र, २०१६ मध्ये मिथुन यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत राजकीय सन्यास घेतला होता. मात्र, भागवत यांच्या भेटीनंतर मिथुन चक्रवर्ती भाजपात प्रवेश करुन पुन्हा एकदा राजकारणात पाऊल ठेवणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

हेही वाचा

Pooja Chavan Case l माझ्याकडेही भाजपा नेत्यांची महिलांसोबतची डझनभर प्रकरणं;’या’मंत्र्याचा दावा!

54 प्रवाशांनी भरलेली बस सरोवरात कोसळली;मृतदेह काढले बाहेर

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर वाहनांची एकमेकांना धडक; भीषण अपघातात पाच ठार,पाच गंभीर

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे पर 5 गाड़ियों में टक्कर; 5 लोगों की मौत,5 घायल