Pratap Sarnaik l ‘त्या’ पत्रानंतर प्रताप सरनाईक पहिल्यांदाच आले समोर,म्हणाले…

monsoon-session-maharashtra-2021-legislative-assembly-and-council-session-shivsena-pratap-sarnaik-on-ed-bjp
monsoon-session-maharashtra-2021-legislative-assembly-and-council-session-shivsena-pratap-sarnaik-on-ed-bjp

मुंबई l सक्तवसुली संचलनालयाकडून Enforcement  Directorate सुरु असलेली कारवाई तसंच उद्धव ठाकरेंना Uddhav Thackeray पत्र लिहून भाजपासोबत पुन्हा युती करण्याची मागणी करणारे शिवसेना ShivSena आमदार प्रताप सरनाईक Pratap Sarnaik विधानभवनात दाखल झाले. गेल्या काही दिवसांपासून गायब असणारे प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. दरम्यान यावेळी त्यांनी आपल्यावरील कारवाईचा निषेध करताना मी काही विजय माल्या Vijay Mallya वा नीरव मोदी Nirav Modi नाही असं म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

“या देशात किंवा कुठेही माझ्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल नाही किंवा तक्रार नाही. कोणीही माझ्याविरोधात जबाब दिलेला नाही. सर्वोच्च न्यायालयानं संरक्षण दिलं आहे. ईडीच्या कारवाईमुळे मी गायब झालो असं नाही. माझ्यावर झालेली ह्रदयरोगाची शस्रक्रिया. पत्नी कर्करोगाशी झुंज व घरात करोनाशी लढा या सगळ्यात मी अडकलो होतो. यामुळे मी शांत बसण्याचा निर्णय घेतला होता,” असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.

“मी काही विजय माल्या, नीरव मोदी किंवा मेहुल चोक्सी नाही जो गायब होणार किंवा बाहेर जाणार. कचाट्यात सापडलो म्हणून पळून जाणार असं नाही,” असंही ते म्हणाले.पुढे त्यांनी सांगितलं की, “महाविकास आघाडी सरकार स्थापनेसंदर्भातील सगळ्या घडामोडीत मी आधीपासूनच होतो ही वस्तुस्थिती आहे. मातोश्रीवर आमदारांची जी बैठक झाली, तसंच शब्द दिल्याप्रमाणे अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्यासंबंधीची घोषणा प्रवक्ता म्हणून मीच केली.

महाविकास आघाडी सरकार स्थापनेवेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आमदारांच्या संपर्कात होतो. त्यानंतर ज्या ज्या वेळेस आघाडीवर विरोधकांनी आरोप केले, त्यावेळी प्रवक्ता म्हणून त्याला विरोधाचं काम मी केलं होतं. अर्णब गोस्वामीने अन्वय नाईक प्रकरण बंद केलं होतं त्याविरोधीत मी आवाज उठवला. अलिबागमधील प्रकरण बाहेर काढावं यासाठी आंदोलन केलं. कंगनाने मुख्यमंत्री, महाराष्ट्राविषयी जे अपशब्द वापरले त्याविरोधात वक्तव्य केलं. हक्कभंगाचा ठराव मांडला

हेही वाचा 

…तरी सत्तेचा सोपान त्यांना पार करता येणार नाही;शिवसेनेचा भाजपवर निशाणा

Maharashtra Assembly Monsoon Session 2021 l अधिवेशन ‘या’ मुद्द्यांवर गाजणार!

राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांना बलात्काराची धमकी देणारा गजाआड

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here