Monsoon 2022: यंदा मान्सून 10 दिवस आधीच भारतात धडकणार!

Monsoon in India 2022: मान्सूनचे आगमन लवकरच; युरोपियन सेंटर फॉर मिडियम रेंज वेदर फोरकास्टने व्यक्त केला आहे.

monsoon-will-knock-in-the-india-10-days-before-expected-to-hit-kerala-coast-on-may-21-news-update-today
monsoon-will-knock-in-the-india-10-days-before-expected-to-hit-kerala-coast-on-may-21-news-update-today

मुंबई: उष्णतेच्या लाटेमुळे देशभरात नागरिकांना उन्हाचे तीव्र चटके बसत आहेत. मात्र, उन्हामुळे हैराण झालेल्या देशवासीयांसाठी दिलासादायक बातमी आहे. युरोपियन सेंटर फॉर मिडियम रेंज वेदर फोरकास्टनुसार (European Center for Medium Range Weather Forecast) यंदा भारतात 10 दिवस आधीच मान्सून (Monsoon in India) धडकणार आहे. पुढील 10 ते 12 दिवसांमध्ये तो महाराष्ट्रात दाखल होईल,असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मान्सून केरळच्या किनारपट्टीवर 20 किंवा 21 मे रोजीच दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून केरळमध्ये नेहमी साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होतो. त्यानंतर तो देशाच्या इतर भागात पोहोचते.

बंगालच्या उपसागरात नुकतेच झालेले हवामान बदल अरबी समुद्रात अँटीसायक्लोन क्षेत्र तयार होत असल्याचे सूचित करतात. त्यामुळे मान्सून केरळमध्ये लवकरच पोहोचू शकतो. त्याच्या प्रभावाखाली पश्चिम विभागाच्या इतर भागातही पाऊस पडू शकतो.

दरम्यान, आयएमडीचे हवामानतज्ज्ञ आनंद कुमार दास यांनी सांगितले की, सॅटेलाइट इमेजमधून समोर आलेल्या माहितीनुसार मान्सून हा वेळेवरच येण्याची शक्यता आहे.

केरळमध्ये तो 1 जून रोजी पोहचण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, विषुववृत्ताजवळ ढगांचा समूह तयार होत आहे. जो बराच सक्रिय आहे. त्यामुळे मान्सून लवकरच वेग पकडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

गेल्या आठवडाभरात दक्षिण भारतातील अनेक शहरांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. जो मान्सूनपूर्व पाऊस मानला जातो. 20 मे च्या आसपास मान्सूनचे आगमन झाल्यास हा मोठा हंगामी बदल असेल. त्यामुळे येत्या काही दिवसांत भारताच्या उर्वरित भागात मान्सूनचा पाऊस वेळेपूर्वी सुरू होऊ शकतो.

जर केरळमध्ये 20 मे रोजी मान्सून दाखल झाला, तर जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून देशाच्या प्रत्येक भागात मान्सूनचा पाऊस सुरू होईल. त्यामुळे विविध भागात भातासह इतर हंगामी पिकांच्या पेरण्या वेळेवर होण्याची शक्यता आहे. देशात 70 टक्के पाऊस मान्सूनमध्ये पडतो असे मानले जाते.

मान्सूनचा पाऊस वेळेवर आणि चांगल्या झाल्यास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेली दोन वर्ष चांगल पीक होऊन देखील महाराष्ट्रातील अनेक भागात वादळं आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं. मात्र, यंदा वरुणराजाने कृपादृष्टी दाखवल्यास बळीराजा मात्र नक्कीच सुखावेल.

केरमध्ये 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होणार…

विषुववृत्ताजवळील एका विशिष्ट भागात ढगांची सक्रियता वाढली आहे. उपखंडातील पर्जन्यमानावर परिणाम होत असतो. यंदा ते खूप सक्रिय असल्याने मान्सूनची वाटचाल वेगाने होण्याची चिन्हे आहेत. केरळमध्ये मान्सून व 1 जूनपर्यंत दाखल होईल.

आनंद कुमार दास, तज्ज्ञ, भारतीय हवामान खाते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here