Morbi Bridge Collapsed : गुजरात पूल दुर्घटनेत भाजपा खासदाराच्या कुटुंबातील १२ जणांचा मृत्यू

Morbi Bridge Collapsed  : गुजरातच्या मोरबीमधील मच्छू नदीवरील पूल कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. रविवारी (३१ ऑक्टोबर) संध्याकाळी घडलेल्या या भीषण घटनेत १३२ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी आहेत. दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांवर उपचार करण्यात येत असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या दुर्घटनेत राजकोटचे भाजपा खासदार मोहनभाई कल्याणजी कुंदारिया यांच्याही परिवारातील १२ जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती खुद्द कुंदारिया यांनी ‘इंडिया टुडे’ला दिली आहे.

 मोहनभाई कल्याणजी कुंदारिया हे राजकोटचे खासदार आहेत. “माझ्या बहिणीच्या परिवारातील एकूण १२ सदस्यांचा या दुर्घनटेत मृत्यू झाला आहे. यामध्ये पाच छोट्या मुलांचाही समावेश आहे,” असे कुंदारिया यांनी सांगितले आहे. तसेच बचावकार्य आणि मदतीविषयी बोलताना, “एनडीआरए, एसडीआरए तसेच स्थानिक प्रशासन नदीत बुडालेल्या लोकांचा शोध घेत आहेत. त्यासाठी काही रेस्क्यू बोटींची मदत घेण्यात आहे. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे,” असे कुंदारिया यांनी सांगितले.

 या दुर्घटनेत आतापर्यंत १३२ जणांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्य अजूनही सुरू असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दुर्घटनाग्रस्त पूल सुरू करण्यास कोणी परवानगी दिली तसेच पूल कोसळण्याचे कारण काय? असा प्रश्न विचारला जात असताना. या घनटेची सखोल चौकशी केली जाईल. तसेच या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. यामध्ये मृत झालेले बहुतांश महिला आणि छोटी मुलं आहेत,” असे कुंदारिया यांनी सांगितले. घटनेची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here