FASTag कडून टोलवर कट झाले जास्त पैसे? नो टेन्शन, Paytm देणार रिफंड

more-money-deducted-toll-from-fastag-now-paytm-will-give-refund
more-money-deducted-toll-from-fastag-now-paytm-will-give-refund

मुंबई: पेटीएम पेमेंट बँक Paytm Payment Bank ने गेल्या काही दिवसांमध्ये टोल प्लाजामध्ये होणाऱ्या अनेक आर्थिक संकटांवर तोडगा काढला आहे. पेटीएमने Paytm आतापर्यंत 82 टक्के FASTag वापरणाऱ्या ग्राहकांची FASTag Users समस्या सोडवली आहे. यावर बँकेने आता ग्राहकांना Customers पुन्हा एकदा अलर्ट केलं आहे. टोलवर ग्राहकांचे जास्त पैसे कट झाले असतील तर पेटीएम यासाठी तुम्हाला मदत करणार आहे.

Paytm Payment Bank च्या माहितीनुसार,ऑटो मेटेड पेमेंट प्रबंधन प्रक्रिया अंतर्गत टोल प्लाझावरील FASTag पेक्षा अधिक रक्कम घेतल्यास तातडीने परत मिळतील. पेटीएम पेमेंट्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सतीश गुप्ता यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.

वाचा: पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाही;शिवसेनेचा भाजपला इशारा

“वापरकर्त्यांना रस्त्यावर चांगला प्रवास उपलब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या अंतर्गत, आम्ही वापरकर्त्यांना सगळ्या मार्गाने मदत करतो. यामध्ये टोल प्लाझावरील तक्रारींचे निवारण देखील आता करण्यात येणार आहे. यामुळे आता ग्राहकांना जर अशा समस्या आल्या तर बँकेशी तात्काळ संपर्क करा.

15 फेब्रुवारीपासून Fastag केलं अनिवार्य

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने सर्व गाड्यांना Fastag अनिवार्य केले आहे. त्यामुळे आता देशातील कोणत्याही राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करण्यासाठी तुमच्या गाडीवर Fastag असणे बंधनकारक आहे. 15 फेब्रुवारीपासून या नियमाची अंमलबजावणी झाली होती. मात्र, त्यानंतर काही वाहनचालकांना टोलनाक्यावर FASTag स्कॅन होत नसल्याच्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या वाहनचालकांना दुप्पट टोलचा भुर्दंडही सहन करावा लागत आहे.

कसा खरेदी कराल FASTag ?

फास्ट टॅग देशभरातील कोणत्याही टोल बुथवर खरेदी करता येते. FASTag खरेदी करण्यासाठी तुमच्या गाडीच्या रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्ससह आयडीची आवश्यकता आहे. याव्यतिरिक्त स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, पेटीएम पेमेंट्स बँक आणि आयडीएफसी फर्स्ट आदि बँकांसह 22 बँकांमधून खरेदी करु शकता.

याशिवाय पेटीएम, अमेझॉन आणि फ्लिपकार्डसारख्या ई-कॉमर्स प्लेटफॉर्मवरही तुम्ही फास्ट टॅग खरेदी करु शकता. अनेक बँकांनी आपल्या मोबाईल अॅपवर फास्ट टॅग खरेदीवर डिस्काऊंट, एक्सक्लुसिव्ह ऑफर्स आणि कॅशबॅक ऑफर दिले आहे.

किती आहे FASTag ची किंमत?

FASTag ची किंमत दोन बाबींवर अवलंबून आहे. तुमच्याकडे वाहन कोणते आहे आणि तुम्ही कुठून FASTag खरेदी करता यावर त्याची किंमत अवलंबून आहे. इश्यू फी आणि सिक्युरिटी डिपॉझिटची किंमत प्रत्येक बँकेची वेगळी असू शकते. FASTag तुम्ही घरबसल्या खरेदी करु शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here