उद्रेक: महाराष्ट्रात आज ८ हजार ८०७ कोरोनाचे रुग्ण सापडले, ८० रुग्णांचा मृत्यू

maharashtra-49447-new-covid-cases-and-277-deaths-in-the-last-24-hour-news-updates
maharashtra-49447-new-covid-cases-and-277-deaths-in-the-last-24-hour-news-updates

मुंबई: मुंबईसह महाराष्ट्रात दररोज कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. आज राज्यात ८ हजार ८०७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. काल मंगळवारी ६ हजार २१८ नवे कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. त्यातुलनेत आजचे प्रमाण जास्त आहे. राज्यात आज कोरोनामुळे ८० रुग्णांचा मृत्यू झाला.

सध्या महाराष्ट्रातील मृत्यूदर २.४५ टक्के एवढा आहे. त्याचवेळी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७० टक्के एवढे आहे. राज्यात सध्या २ लाख ९५ हजार ५७८ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. २,४४६ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात अजून ५९ हजार ३५८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज २ हजार ७७२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत २० लाख ८ हजार ६२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा ७४३ वर पोहोचला
आज पुणे शहरात दिवसभरात ७४३ करोना बाधित रुग्ण आढळले. तीन करोना रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ३८२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मंगळवारी पुण्यात दिवसभरात ६६१ नवे करोनाबाधित आढळले, तर चार रुग्णांचा मृत्यू झाला होता.

वाचा: भाजपच्या त्रासाला कंटाळून खासदार मोहन डेलकर यांची आत्महत्या?; काँग्रेसचा आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here