Motorola ने नुकतंच 2022 चा नवाकोरा फ्लॅगशिप किलर स्मार्टफोन Edge 30 लॉन्च केला आहे. काही वर्षांमध्ये कंपनी हळूहळू पण स्थिरपणे स्मार्टफोन मार्केटमध्ये आघाडीवर आली आहे. हा स्मार्टफोन मोटोरोला कंपनीच्या आतापर्यंतच्या सर्वात बेस्ट स्मार्टफोन्सपैकी एक आहे.
मोटोरोलाने आपला हा नवा स्मार्टफोन Edge सीरीजमध्ये सादर केला आहे. स्नॅपड्रॅगन 778G+ चिपसेट तसंच 8GB RAM आणि 256GB इनबिल्ट स्टोारेज देण्यात आले आहेत. या फोनच्या फिचर्सबद्दल बोलायचं झालं तर OLED डिस्लेनी , 144Hz सोबत, 50MP चा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि 32MP चा सेल्फीL कॅमेरा मिळतोय.
कॅमेरा
कॅमेराबद्दल बोलायचं झालं तर यात ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून 50 MP चा प्रायमरी सेंसर, 50 MP चा अल्ट्रा वाइड अॅंगल कॅमेरा आणि एक 2MP डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 32MP चा कॅमेरा आला आहे. कनेक्टिविटी मध्ये 5G, 4G LTE, वायफाय 6E, ब्लुटूथ 5.2, GPS, NFC आणि USB टाइप-C पोर्ट समाविष्ट आहे. मोटोरोला एज 30 मध्येN 4,020mAh ची बॅटरी, 3W टर्बोपॉवरिंग सपोर्टला दिली आहे.
मोटोरोलाच्या एज 30 ची किंमत
Motorola Edge 30 ची सुरुवातीची किंमत EUR 449.99 (जवळपास 36,300 रुपये) 8GB + 128GB व्हेरिएंटसाठी आहे. कंपनीच्या वेबसाइटनुसार, 8GB + 256GB मॉडेलसाठी लवकरच ही किंमत जाहीर केली जाईल. हा फोन ऑरो ग्रीन, मेटेओर ग्रे आणि सुपरमून सिल्वलर कलरविल्पन सोबत मिळतोय. हा स्मार्टफोन यूरोपीयन बाजारपेठेत लॉन्चम केला गेला आहे. भारतासह अनेक देशांत हा स्मार्टफोन काही आठवड्यानंतर लॉन्च् करण्यात येईल.