Moto G9 Power स्मार्टफोन झाला लाँच, पाहा खास फिचर्स आणि किंमत

motorola-moto-g9-power-launched-in-india-with-a-big-6000-mah-battery-check-price-specifications-and-more
motorola-moto-g9-power-launched-in-india-with-a-big-6000-mah-battery-check-price-specifications-and-more

Motorola कंपनीने आपला लेटेस्ट स्मार्टफोन Moto G9 Power भारतात लाँच केला. 4जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 11,999 रूपये ठेवण्यात आली आहे. 15 डिसेंबरपासून फ्लिपकार्टवरुन या फोनची विक्री सुरू होईल. Moto G9 Power मध्ये तब्बल 6000 mAh क्षमतेच्या पॉवरफुल बॅटरीसह होल-पंच डिस्प्ले डिझाइन आणि ट्रिपल रिअर कॅमेरा यांसारखे अनेक खास फिचर्स आहेत.

Moto G9 Power स्पेसिफिकेशन्स 

Moto G9 Power फोनमध्ये 6.8 इंचाचा एचडी+ IPS डिस्प्ले असून स्नॅपड्रॅगन 662 SoC चिपसेट प्रोसेसर आहे. ड्युअल नॅनो सिम कार्ड्सना सपोर्ट करणारा हा फोन अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करतो.

या फोनमध्ये तीन रिअर कॅमेरे आहेत. यात 64 मेगापिक्सेलच्या प्रायमरी कॅमेऱ्यासोबत एक 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो आणि एक 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर आहे. तर, सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळेल.

Moto G9 Power बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी 

रिअर फिंगरप्रिंट सेन्सर असलेल्या या फोनमध्ये कंपनीने फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 6000mAh क्षमतेची मोठी आणि दमदार बॅटरी दिली आहे. हा फोन इलेक्ट्रिक व्हायोलेट आणि मेटालिक सेज  Electric Violet and Metallic Sage अशा दोन कलर्सच्या पर्यायांत उपलब्ध असेल.

हेही वाचा l Maruti, Hyundai और Tata की कार सस्ते में, 1 लाख रुपये तक की छूट

कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 4G LTE, वाय-फाय 802.11 ac, ब्लूटूथ व्हर्जन 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, एनएफसी, युएसबी टाइप-C आणि 3.5 mm हेडफोन यांसारखे पर्याय आहेत. 

हेही वाचा l Aadhaar Card : आधार के साथ कौन सा मोबाइल नंबर और ईमेल आईडी है रजिस्टर, ऐसे करें चेक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here