Motorola one fusion+ : 64 मेगापिक्सेलसह पाच कॅमेरे, फोन खरेदीची संधी

फोनसाठी फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर सुरुवात, भारतात 17 हजार 499 रुपये किंमत

motorola-one-fusion-gon-on-sale-via-flipkart-in-india
motorola-one-fusion-gon-on-sale-via-flipkart-in-india

नवी दिल्ली :  ग्राहाकांच्या आवडी निवडीनुसार कंपन्या फोन विक्रीसाठी उपलब्ध करुन देत आहेत. Motorola कंपनीचा लेटेस्ट Motorola one fusion+ हा स्मार्टफोन खरेदी करण्याची चांगली एक संधी आहे. पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेल्या या फोनसाठी फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर आज गुरुवार (27 सप्टेंबर) दुपारी 12 वाजेपासून सेलला सुरूवात झाली आहे. ( Motorola one fusion+ smart phone)

ट्विलाइट ब्लू आणि मूनलाइट व्हाइट अशा दोन कलरच्या पर्ययांमध्ये हा फोन उपलब्ध आहे. क्वॉड रिअर कॅमेरा म्हणजे मागील बाजूला चार कॅमेऱ्याचा सेटअप असून यातील मुख्य कॅमेरा 64 मेगापिक्सेलचा आहे. तर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगल लेन्स, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे.

याशिवाय, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमेरा आहे. तसेच, फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरीही या फोनमध्ये आहे. ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्ट असलेल्या Motorola one fusion+ फोनला 6.5 इंच फुल-एचडी+ (1,080×2,340 पिक्सल) नॉच-लेस डिस्प्ले आहे.

अँड्रॉइड 10 वर कार्यरत असलेल्या या फोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी स्नॅपड्रॅगन 730जी चिपसेट आणि ग्राफिक्ससाठी ऐड्रेनो 618 जीपीयू आहे. इंटर्नल स्टोरेज माइक्रोएसडी कार्डद्वारे तब्बल 1 टीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. फोनच्या रिअर पॅनलवर फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फोनमध्ये डेडिकेटेड गुगल असिस्टंट बटणही दिलं आहे.

काय आहे किंमत आणि ऑफर

मोटोरोला वन फ्यूजन प्लस (6 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज) ची भारतात किंमत 17 हजार 499 रुपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here