
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शरद पवार यांचा आज ८२ वा वाढदिवस असून सोशल मीडियावरुन अनेकांनी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये सुप्रिया सुळेंचाही समावेश असून सोशल मीडियावर सुप्रिया सुळेंची पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावरुन सुप्रिया यांनी आपल्या वडिलांबद्दलच्या भावना अगदी मोजक्या शब्दांमध्ये व्यक्त केल्या आहेत. आपल्या ट्वीटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन वडिलांबरोबरच फोटो पोस्ट करत सुप्रिया यांनी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.
वडिलांबरोबर काढलेला एक फोटो केला शेअर…
‘प्रिय बाबा’ या शब्दांसहीत सुप्रिया यांनी खास पोस्ट लिहिली आहे. “प्रिय बाबा, तुम्ही आम्हा सर्वांसाठी उर्जेचा अखंड स्रोत आहात. समाजकारण, राजकारण या क्षेत्रांसह कौटुंबिक पातळीवर देखील तुम्ही आम्हा सर्वांचे आदर्श आहात,” असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. “तुमच्या विचारांची स्वाभिमानी मशाल घेऊन आम्ही सर्वजण आपल्यासोबत अविश्रांत चालण्याचा प्रयत्न करीत आहोत. बाबा, तुम्हाला निरोगी दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,” असं या पोस्टमध्ये सुप्रिया यांनी म्हटलं आहे.
प्रिय बाबा,
तुम्ही आम्हा सर्वांसाठी उर्जेचा अखंड स्रोत आहात. समाजकारण, राजकारण या क्षेत्रांसह कौटुंबिक पातळीवर देखील तुम्ही आम्हा सर्वांचे आदर्श आहात. तुमच्या विचारांची स्वाभिमानी मशाल घेऊन आम्ही सर्वजण आपल्यासोबत अविश्रांत चालण्याचा प्रयत्न करीत आहोत. pic.twitter.com/DgeMVg7OyD— Supriya Sule (@supriya_sule) December 12, 2022
राष्ट्रवादी काँग्रेसनेही पवारांच्या जुन्या, नव्या फोटोंचं कोजाल करुन तयार केलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून पक्षातील सर्वोच्च नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.
शरद पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये केंद्रातील कृषीमंत्री पदापासून ते राज्यच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतच्या अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
बाबा, तुम्हाला निरोगी दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Birthday Baba 💞
— Supriya Sule (@supriya_sule) December 12, 2022