MPSC ची परीक्षा पुढे ढकलली, मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची घोषणा

cm-uddhav-thackeray-comment-on-mumbai-metro-carshed-shifted-to-kanjurmarg
cm-uddhav-thackeray-comment-on-mumbai-metro-carshed-shifted-to-kanjurmarg

मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने MPSC ची परीक्षा पुढे ढकलली. या बाबतची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. “११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात MPSC ची परीक्षा होती. मात्र करोना आणि लॉकडाउनचं संकट होतं. याचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला. ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात MPSC ची परीक्षा होती.

मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर या प्रकरणी मंत्रिमंडळाची बैठक आज झाली. या बैठकीत ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे. यासंबंधी राज्य सरकारच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज पार पडली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा निर्णय झाला. “११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात MPSC ची परीक्षा होती. ढकलण्याचा निर्णय झाला आहे. २ लाख ६० हजार विद्यार्थी या परीक्षेला बसणार होते.

वाचा : MARATHA RESERVATION l ओबीसी, दलितविरोधात, तलवारीची भाषा कशासाठी? वडेट्टीवारांचा संभाजीराजेंना सवाल

मात्र करोना आणि लॉकडाउनचं संकट होतं. काही प्रमाणात अजूनही आहे. त्यामुळे आम्ही एक सारासार विचार केला. विद्यार्थ्यांना अभ्यासाला मिळाला पाहिजे हा विचार आम्ही केला त्यामुळे आम्ही ही परीक्षा पुढे ढकलत आहोत. परीक्षा कधी होणार याचा निर्णयही लवकरच घेतला जाईल” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं.

आजच खासदार उदयनराजे भोसले यांनीही एक फेसबुक पोस्ट लिहून MPSC ची परीक्षा पुढे ढकलावी असं म्हटलं होतं. मराठा समाज संयमी आणि शांत आहे पण प्रसंगी आक्रमकही होऊ शकतो असंही त्यांनी म्हटलं होतं. तर मराठा आरक्षण प्रकरणी वेळ पडल्यास आपण तलवारही उपसू शकतो असं वक्तव्य संभाजीराजेंनी केलं होतं.

 मराठा तसेच इतर समाजातील विद्यार्थ्यांकडून मागणी करण्यात आली होती

MPSC च्या परीक्षेची तारीख सध्या आम्ही पुढे ढकलली आहे. मात्र यापुढे जी तारीख ठरेल त्या तारखेत बदल केला जाणार नाही. मराठा समाज इतर समाजाकडून आम्हाला MPSC ची परीक्षा  पुढे ढकला अशी विनंती केली होती.

जे विद्यार्थी  परीक्षेला पात्र आहेत तेच विद्यार्थी जेव्हा परीक्षा जाहीर होईल तेव्हा त्या परीक्षेसाठी एकही विद्यार्थी अपात्र ठरणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. काही विद्यार्थी करोनाग्रस्त आहेत.

वाचा : Maratha Reservation l मराठा समाजाचा महाराष्ट्र बंद मागे

काही विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळालेला नव्हता. त्यामुळे ११ ऑक्टोबरची MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. यावेळी ना. अशोक चव्हाण, ना. जयंत पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here