Mr.India Manoj Patil l ‘मिस्टर इंडिया’ बॉडीबिल्डर मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न, कूपर रुग्णालयात उपचार सुरु

मनोज पाटील आणि साहिल खानमध्ये काही व्यावसायिक वाद

mr-india-body-builder-manoj-patil-tried-to-commit-suicide-allegation-actor-sahil-khan-in-sucide-note-news-update
mr-india-body-builder-manoj-patil-tried-to-commit-suicide-allegation-actor-sahil-khan-in-sucide-note-news-update

मुंबई l मिस्टर इंडिया (Mr.India) बॉडीबिल्डर (Body Builder) मनोज पाटील  (Manoj Patil) याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मनोजने एक सुसाईट नोट लिहिली आहे. यात त्याने बॉलिवूड अभिनेता साहिल खानच्या नावाचा उल्लेख केला आहे. सध्या मनोज पाटीलवर मुंबईतील कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

मनोज पाटीलच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज पाटीलची प्रकृती सध्या गंभीर आहे. मात्र त्याच्या कोणतेही धोक्याचे कारण नाही, नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी जे विषारी किंवा गोळ्या घेतल्या होत्या त्या शरीरातून काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे. सध्या त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

बुधवारी (१५ सप्टेंबर) रात्री हा सर्व प्रकार घडला आहे. मनोजने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईट नोट लिहिली आहे. या सुसाईटमध्ये त्याने अभिनेता साहिल खानकडून जो मानसिक त्रास दिला जात होता. त्रास आणि बदनामीमुळेच आपण आत्महत्येचं पाऊल उचलत असल्याचं मनोज पाटीलने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.

मिस्टर इंडिया मनोज पाटील मिस्टर ऑलिम्पियासाठी प्रयत्न करत होता. याचवेळी साहिल खान देखील बॉडीबिल्टर असल्याने तोही  ऑलिम्पियासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येत आहे. यात मनोज पाटीलला ऑलिम्पियासाठी एंट्री किंवा व्हिसा मिळून नये यासाठी साहिल खान प्रयत्न करत होता. यामुळे मनोजला मिस्टर ऑलिम्पिया जात नेणार नाही. यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न साहिल खान करत होता. असा आरोप मनोज पाटीलने त्याच्या सुसाईट नोटमध्ये केले आहेत.

मनोज पाटील आणि साहिल खानमध्ये काही व्यावसायिक वाद देखील आहेत. यापूर्वी साहिल खानने मनोज पाटीलविरोधात स्वत:च्य़ा इंस्टाग्राम, फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर अकाऊंटवरून मनोज पाटीलविरोधात बदनामी कारक पोस्ट केल्या होत्या. त्यामुळे मनोज पाटीलची समाजात बदनामी होत होती. या बदनामी कंटाळूनचं त्याने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे सुसाईट नोटमध्ये लिहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here