मुंबईत ‘बर्निंग बाइक’l मुंबईत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 25 दुचाकी जळून खाक

mumbai-20-25-bikes-got-fire-in-parking-at-nehrunagar-kurla-news-update
mumbai-20-25-bikes-got-fire-in-parking-at-nehrunagar-kurla-news-update

मुंबई l  कुर्ला येथील नेहरुनगर परिसरात 25 मोटारसायकलला आग लागल्याची घटना घडली आहे. मोटारसायकलला आग कशी लागली की मुद्दाम कोणीतरी मोटारसायकल जाळण्याचा प्रयत्न केला?, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

आज पहाटे ४च्या दरम्यान इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या जवळपास २० दुचाकींनी पेट घेतला व क्षणात ही आग वाढत गेली. या आगीत २० मोटारसायकल जळून खाक झाल्या आहेत. ही आग इतकी भीषण होती की आगीचे लोट इमारतीच्या आठव्या मजल्यापर्यंत येत होती. या घटनेमुळं नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

कुर्ला नेहरुनगर येथे पार्किंगमध्ये उभी असलेल्या बाईकमध्ये अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 16 फायर इंजिन 18 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरु केला आहे. ही आग नेमकी कशी लागली, कशामुळे लागली याचं कारण अज्ञापही गुलदस्त्यात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here