Mumbai APMC : महाआघाडीचा झेंडा; सभापती,उपसभापतीची बिनविरोध निवड!

mumbai-apmc-speaker-election-maha-vikas aghadi won
mumbai-apmc-speaker-election-maha-vikas aghadi won

नवी मुंबई : मुंबई एपीएमसीच्या सभापतीपदी अशोक डक तर उपसभापतीपदी धनंजय वाडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. (Mumbai APMC Speaker Election Ashok Dak won) निवडणुकीत महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत मराठवाडा महसूल विभागाचे अशोक डक यांना सभापतीपद मिळाले. तर पुणे महसूल विभागातून महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय वाडकर यांना उपसभापतीपद बिनविरोधपणे देण्यात आले.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) निवडणुकीत महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला होता, तर भाजपला खातंही उघडता आलेलं नव्हतं. सहा महसूल आणि चार व्यापारी मतदारसंघात भाजपला एकाही जागेवर विजय न मिळवता आल्याने महाविकास आघाडीने एपीएमसीवर निर्विवाद वर्चस्व ठेवलं होतं.

एपीएमसी सभापती निवडणूक महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची समजली जात होती. महाविकास आघाडीचे एकहाती वर्चस्व एपीएमसीवर प्रस्थापित झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here