Cruise Drugs Party Case l आर्यन खानसह आठ जणांच्या जामीनावर आज फैसला!

aryan-khan-bail-granted-latest-news-bombay-high-court-allows-bail-to-shah-rukh-khan-son-arbaaz-merchant-and-munmun-dhamecha-mumbai-cruise-drug-party-ncb-news
aryan-khan-bail-granted-latest-news-bombay-high-court-allows-bail-to-shah-rukh-khan-son-arbaaz-merchant-and-munmun-dhamecha-mumbai-cruise-drug-party-ncb-news

मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणी आर्यन खान (Cruise Drugs Party Case) आणि सात इतर आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आर्यन खानला कोठडी दिल्यानंतर आर्यन खानसह आठही जणांकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे. या आठही जणांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सकाळी ११ वाजता सुनावणी होणार आहे. त्यामुळे आर्यन खानला जामीन मिळणार की, कोठडीत वाढ होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या एनसीबी कोठडीबाबत गुरुवारी सुनावणी झाली. मुंबई न्यायालयाने आर्यन खानसह ८ जणांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाने म्हटले आहे की एनसीबीला तपासासाठी पुरेपूर संधी आणि वेळ देण्यात आली आहे, त्यामुळे आता त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले जात आहे.

न्यायालयाचे म्हणणे आहे की आता विशेष एनडीपीएस न्यायालय या प्रकरणाची पुढील सुनावणी करेल. दरम्यान  आरोपींना कारागृहात न पाठवता एक दिवस एनसीबी कोठडीतच ठेवण्याची विनंती बचावपक्षाकडून करण्यात आली. ती न्यायालयाने मान्य केली आहे. आर्यनच्या जामिनाबाबत शुक्रवारी सकाळी सुनावणी होणार आहे.

एनसीबीने कोर्टाकडे आर्यन खान आणि त्याच्या दोन साथीदारांची कोठडी ११ ऑक्टोबरपर्यंत वाढवावी अशी मागणी केली होती. एनसीबीने सांगितले की या प्रकरणात आतापर्यंत १७ लोकांना अटक करण्यात आली आहे. नवीन अटक अचित कुमारची आहे, ज्याला आर्यन खानच्या वक्तव्याच्या आधारे अटक करण्यात आली आहे.

एनसीबीने असा युक्तिवाद केला की आणखी छापे पडू शकतात आणि यावेळी अटक केलेले लोक नव्याने अटक केलेल्या लोकांशी समोरासमोर येतील, त्यामुळे त्यांची कोठडी वाढवली पाहिजे. एनसीबीने न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणाच्या तपासासाठी यापूर्वी अटक केलेल्या आठ जणांसोबत अचित कुमारचा समोरासमोर येणे आवश्यक आहे. त्याचबरोबर न्यायालयाने अचित कुमारला ९ ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या ताब्यात दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here