सोमवारच्या ‘महाराष्ट्र बंद’ला मुंबईच्या डबेवाल्यांचा पाठिंबा!

mumbai-dabbawala-association-support-mva-calls-maharashtra-bandh-news-update
mumbai-dabbawala-association-support-mva-calls-maharashtra-bandh-news-update

मुंबई: लखीमपूर हिंसाचाराच्या (Lakhimpur Kheri Violence) पार्श्वभूमीवर ११ ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’(Maharashtra Bandh) करण्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (jayant patil) यांनी केली होती. या बंदमध्ये सरकारमधील इतर सहकारी पक्ष ही सहभागी झाले आहेत. शिवसेना (ShivSena) आणि काँग्रेसनंही (Congress) या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. आता मुंबई डबेवाला (Mumbai Dabbawala) असोशियसनही या बंदला जाहीर पाठिंबा दिला आहे. रविवारी रात्री १२ वाजल्यापासून हा बंद सुरू होणार आहे.

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा ‘मुंबई डबेवाला असोशिएशन’ निषेध करत आहे. भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने त्याची कार आंदोलक शेतकऱ्यांवर चढविल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री तिथे आपला मुलगा नव्हता असा दावा करत आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रकरण वाढत असल्याचे पाहून या मंत्रीपुत्रावर गुन्हा दाखल केला आहे. परंतू ८ जणांचा मृत्यू झालेला असला तरी देखील म्हणावा तसा तपास पोलिसांनी केला नाही.

लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. येत्या ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदचं आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आलं आहे. या महाराष्ट्र बंदला ‘मुंबई डबेवाला असोशिएशन’ जाहीर पाठिंबा देत आहे, असं मुंबई डबेवाला असोशियसनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी म्हटलं आहे.

शेतकरी आणी कामगार, भारताच्या विकास रथाची ही दोन चाके आहेत यांचा मान सन्मान हा राखला गेलाच पाहीजे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांचेवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई केली गेली पाहीजे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here