Mumbai Dabbawala : राज ठाकरेंकडे मुंबई डबेवाल्यांनी केली ‘ही’ मागणी

राज ठाकरेंकडून डबेवाल्यांना पाठपुरावा करण्याचे आश्वासन

mumbai-dabbawala-meet-raj-thackeray-krishnakunj-for-local-train-travel-demand
mumbai-dabbawala-meet-raj-thackeray-krishnakunj-for-local-train-travel-demand

मुंबई : मुंबई डबेवाल्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  यांची आज (24 सप्टेंबर)  कृष्णकुंजवर निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान डबेवाल्यांनी मुंबईतील लोकल रेल्वेने प्रवास करण्यास परवानगी मिळावी, अशी प्रमुख मागणी केली. (Mumbai Dabbawala Meet Raj Thackeray)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकलसेवा बंद आहे. अत्यावश्यक कर्मचा-यांसाठी लोकलसेवा सुरु आहे. आमचं पोट लोकल सेवेवर अवलंबून आहे. त्यामुळे लोकलने प्रवास करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी मुंबई डबेवाला असोशिएशनचे सुभाष तळेकर यांच्या नेतृत्वाखाली डबेवाल्यांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुंबई डबेवाला असोशिएशनचे शिष्टमंडळाने राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंना डबेवाल्यांनी मागण्यांचं निवेदन दिले आहे. मनसेने लोकल सेवा सुरू करण्यासाठी आंदोलन केलं. त्यामुळे सरकारने हा इशारा समजून लोकल सेवा पूर्ववत करावी. आमचं पोट या लोकल सेवेवर अवलंबून आहे. त्यामुळे आता लोकल सुरू न झाल्यास मनसेने वात पेटवली आहे. त्याचा भडका होऊ शकतो. आम्हालाही या आंदोलनात सहभागी व्हावं लागेल, असा इशारा मुंबईतील डबेवाल्यांनी राज ठाकरेंच्या भेटीपूर्वी दिला होता. त्यानंतर त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.

मनसेच्या आंदोलनाला डबेवाल्यांचा पाठिंबा

मनसेच्या लोकल प्रवास सविनय कायदेभंगाला मुंबई डबेवाला असोशिएशनकडून बिनशर्त पाठिंबा देण्यात आला होता. रेल्वे प्रशासनाने लोकलसेवा सुरु करण्याबाबत लवकर निर्णय घ्यावा. अन्यथा मनसेप्रमाणे आम्हाला लोकलने प्रवास करुन सविनय कायदेभंग करावा लागेल, असा इशारा मुंबई डबेवाला असोशिएशनने दिला होता.

डबेवाल्यांना रोजगार मिळालेला नाही

राज्यात कोरोना या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता डबेवाल्यांनी 19 मार्चपासून डबे पोहोचवण्याचा व्यवसाय बंद केला होता. त्यानंतर लॉकडाऊन झाल्याने गेल्या जवळपास साडेपाच महिन्यांपासून डबेवाल्यांना रोजगार मिळालेला नाही. त्यामुळे डबेवाल्यांची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे मुंबईतील लोकलसेवा लवकरात लवकर सुरु करा, अन्यथा डबेवाल्यांना दर महिना किमान 3 हजार रुपये अनुदान द्या, अशी मागणी डबेवाल्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here