मुंबईची कार्तिका नायर ‘नीट’मध्ये देशात पहिली

mumbai-karthika-nair-was-first-in-the-country-in-neet-news-update
mumbai-karthika-nair-was-first-in-the-country-in-neet-news-update

मुंबई : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षेचा (नीट) निकाल सोमवारी  जाहीर झाला असून हैदराबाद येथील मृणाल कुट्टेरी, दिल्ली येथील तन्मय गुप्ता आणि मुंबईची र्काितका नायर (Kartika Nair) यांनी पैकीच्या पैकी (७२०) गुण मिळवून देश पातळीवर पहिला क्रमांक पटकावला आहे.

राष्ट्रीय चाचणी कक्षाने (एनटीए) १२ सप्टेंबर रोजी ही परीक्षा घेतली होती. या परीक्षेचा निकाल अखेर सोमवारी जाहीर झाला. देशभरातील १६ लाख १४ हजार ७७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ८ लाख ७० हजार ७४ विद्यार्थी प्रवेशपात्र ठरले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा प्रवेश पात्रता गुण कमी झाले आहेत.

एकूण ७२० गुणांपैकी साधारण १३८ पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी प्रवेशास पात्र असतील. गेल्यावर्षी प्रवेश पात्रता गुण १४७ होते. दरम्यान देशातील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची संख्या एक लाखाने वाढली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here