“…जे तुमचा बाजार एकाच दिवसात उठवतात”; शिवसेनेचं भाजपावर टीकास्त्र

८० हजार फेक अकाउंट्स, मुंबई पोलिसांच्या बदनामीवर संताप

monsoon-session-maharashtra-2021-legislative-assembly-and-council-session-shivsena-pratap-sarnaik-on-ed-bjp
monsoon-session-maharashtra-2021-legislative-assembly-and-council-session-shivsena-pratap-sarnaik-on-ed-bjp

मुंबई : शिवसेना आमदार, प्रवक्ते प्रताप सरनाईक यांनी ट्विट करत मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्यांना सुनावलं आहे. “ज्या महाराष्ट्रात तुम्ही राहता, त्या महाराष्ट्र भूमीची सुरक्षा घेणाऱ्या मुंबई पोलिसांची खोटी बदनामी करायला तुम्हाला ८० हजार फेक अकाउंट्स तयार करावे लागतात. पण शिवसेनेकडे कट्टर निस्वार्थी अकाउंट्स आहेत, महाराष्ट्र व मुंबईची जनता आहे. जे तुमचा बाजार एकाच दिवसात उठवतात,” असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या तपासाची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियातून मोहीम चालवली गेली होती. भाजपच्या आय़टी सेलकडून बदनामी करण्यात आली असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आला. या प्रकारावरून शिवसेनेनं भाजपाचा नामोल्लेख टाळत टीकास्त्र सोडलं आहे.

वाचा : मोदी सरकार ‘नन्नाचा पाढा’ किती वेळा कशी कशी बाबतीत म्हणणार”;शिवसेनेचा सवाल

सुशांत प्रकरणाचा तपास करत असताना मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी ८० हजार बनावट खाती सोशल मीडियावर तयार करण्यात आली होती, असं मुंबई पोलिसांच्या तपासातून समोर आली. सायबर सेलनं यासंदर्भात एक अहवाल तयार केला असून, त्यात सुशांतची आत्महत्या व मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकारची बदनामी करणाऱ्या पोस्टचा उल्लेख करण्यात आलेला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीही याला दुजारो दिला आहे असून, याच मुद्यावरून शिवसेनेनं विरोधकांवर निशाणा साधला आहे.

या बनावट खात्यांसंदर्भात बोलताना “आम्ही परदेशी भाषांमध्ये असलेल्या या पोस्ट आम्हाला ओळखता आल्या, कारण या पोस्टमध्ये हॅशटॅग वापरण्यात आलेले होते. जसे की #Justiceforsushant #sushantsinghrajput #SSR आणखी काही खात्यांची पडताळणी करण्याचं काम आम्ही करत आहोत,” असं एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यानं सांगितलं होतं.

वाचा : रिया जेलबाहेर, हायकोर्टाकडून जामीन मंजूर

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here