Bollywood bjp drug connection बॉलीवूड- भाजप ड्रग्ज कनेक्शनचा तपास मुंबई पोलिसांना देऊ, गृहमंत्र्यांचा एनसीबीला इशारा

anil-deshmukh-gets-clean-chit-in-cbi-s-preliminary-probe-into-rs-100-crore-case-news-update
anil-deshmukh-gets-clean-chit-in-cbi-s-preliminary-probe-into-rs-100-crore-case-news-update

मुंबई l बॉलीवूड आणि भाजपमधील ड्रग्ज संबंधांची चौकशी करण्याबाबत NCB ने चार दिवसांत निर्णय घेतला नाही तर मुंबई पोलिस या संबंधांचा तपास करतील, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

बॉलीवूड आणि भाजपमधील ड्रग्ज संबंधाची चौकशी करण्याची मागणी करणारे पुराव्यानिशी पत्र काँग्रेसच्या नेत्यांनी ३१ ऑगस्ट रोजीच दिले. हे पत्र मी NCB दिले. मात्र त्याबाबत काहीही कारवाई झाली नाही. काँग्रेसचे नेते आज मला पुन्हा भेटले. ड्रग्ज कनेक्शनचे हे प्रकरण गंभीर आहे.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारकडून राष्ट्रीय तपास यंत्रणांना विनंती करण्यात आली होती. परंतु तपास यंत्रणांवर मोठा दबाव असल्याचे दिसते. तरीदेखील पुन्हा एनसीबीकडे या मागणीचा पुनरुच्चार केला जाईल आणि एनसीबीने चार दिवसांत याबाबत निर्णय घेतला नाही तर मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करतील, असे अनिल देशमुख म्हणाले.

वाचा l ‘’भाजपाने सत्ता असताना मदरशांचे अनुदान का बंद केले नाहीत?’’;नवाब मलिक यांचा सवाल

तत्पूर्वी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सावंत  म्हणाले की, भाजपच्या बॉलिवूड ड्रग कनेक्शन संदर्भातील सर्व पुरावे हे राज्य सरकारतर्फे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणांकडे सोपवले होते. परंतु या माहितीची एनसीबीने अद्याप चौकशी केलेली नाही.

या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपीक निर्मात्याचे नाव येत होते. त्या निर्मात्याची चौकशी करण्याची मागणी भाजप नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी देखील केली होती, परंतु त्या दिशेने तपासच केला गेला नाही. राज्य सरकारने विनंती करुनही याचा तपास केला गेला नाही.

या संदर्भात संदिप सिंह आणि विवेक ओबेरॉय यांचे नाव येत होते. ड्रग कनेक्शन संदर्भात बंगळूरु पोलिसांनी मुंबईत येऊन अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी छापे मारले. परंतु राष्ट्रीय तपास यंत्रणांना वेळ मिळत नाही हे आश्चर्याचे आहे, असेही सचिन सावंत म्हणाले.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांचे आक्षेप

बॉलिवूडमध्ये इतके मोठे निर्माते असताना केवळ संदिप सिंह याच्याच कंपनीची निवड बायोपिकसाठी का केली? सदर बायोपीकच्या पोस्टर अनावरणासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपला अमूल्य वेळ काढून गेले होते.

विवेक ओबेरॉय गुजरातमध्ये भाजपचा स्टारप्रचारकः संदिप सिंहचा पार्टनर हा अभिनेता विवेक ओबेरॉय आहे. या दोघांनी मोदींचा बायोपीक काढला आहे तसेच मोदींची भूमिकाही विवेकनेच केली आहे. विवेक ओबेरॉय गुजरातमध्ये भाजपाचे स्टार प्रचारक होते. केवळ या दोघांच्या कंपनीलाच गुजरात सरकारने बोलवून व्हायब्रंट गुजरातमध्ये १७७ कोटी रुपयांचा करार केला होता.

ड्रग पेडलर आदित्य अल्वा विवेकचा सख्खा मेहुणाः कर्नाटकमध्ये भाजपाच्या प्रचारात सामिल झालेली अभिनेत्री रागिनी व्दिवेदी ही सँडलवूड ड्रग रॅकेटमध्ये पकडली गेली आहे. तिच्याबरोबर १२ लोकांवर ड्रग पेडलिंगचा गुन्हा दाखल केलेला आहे.

वाचा l मुंबई‘फिल्मसिटी’कारस्थानाविरोधात मनसे शिवसेनेचे हातात हात

या १२ लोकांमध्ये आदित्य अल्वा नावाचा व्यक्ती देखील असून तो अद्याप फरार आहे. आदित्य अल्वा हा विवेक ओबेरॉयचा सख्खा मेव्हणा आहे. ही सर्व माहिती चौकशीकरता दिली होती परंतु राष्ट्रीय तपास यंत्रणांनी अद्याप यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.

विवेक ओबेरॉयच्या घरी छापे मारले, त्याच दिवशी मोदी बायोपिक प्रदर्शितः बेंगळूरु पोलीसांनी काल १५ ऑक्टोबरला अभिनेता विवेक ओबेरॉयच्या मुंबईतील घरी छापे मारले. त्याच दिवशी लॉकडाऊन नंतर देशभरात जो पहिला चित्रपट प्रदर्शित करण्यात आला तो नरेंद्र मोदींचा बायोपिक होता.

हा नियतीने ठरवलेला योगायोग आहे. महाराष्ट्र भाजपा कार्यालयात संदिपसिंहने ५३ वेळा कोणाला फोन केला याचे उत्तरही अजून मिळालेले नाही, असे सावंत यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here