
मुंबई l मुंबई आणि उपनगरात काल रात्रीपासूनच पावसाने झोडपले आहे. अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अशात पावसामुळं दरड आणि घरं कोसळण्याच्या घटना देखील घडत आहेत. शनिवारी मध्यरात्री मुंबईतील चेंबुर, विक्रोळी आणि भांडूप या भागात पावसामुळे तीन दुर्घटना घडल्या आहेत. यात एकूण १९ जणांचा मृत्यू झाला आहे.एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून बचावकार्य सुरू आहे. मुंबईतील पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली होती आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, धारावी, अंधेरी, कांदिवली, मिरारोड यांसह अनेक सखल भागात पाणी साचले आहे.त्यामुळे रेल्वे वाहतूक ही बंद झाली आहे. मुंबईतील चेंबुर, विक्रोळी आणि भांडूप या भागात पावसामुळे शनिवारी मध्यरात्री तीन दुर्घटना घडल्या आहेत. यात एकूण 25 जणांचा मृत्यू झाला आहे.
#UPDATE | The death toll rises to 14 in Chembur wall collapse incident, says Rajawadi Hospital in Mumbai pic.twitter.com/JUII9p6u00
— ANI (@ANI) July 18, 2021
चेंबूरमध्ये 14 जणांचा मृत्यू
मुंबईतील चेंबूरच्या वाशीनाका परिसरातील भारत नगर बी ए आर सी संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या भिंतीलगत असणाऱ्या काही झोपड्यांवर ही भिंत कोसळली. तर दुसरीकडे एकूण तीन घरांवर झाड आणि संरक्षक भिंत पडून घरांचे नुकसान झाले आहे. यात अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. आज सकाळी सातच्या सुमारास दुर्घटना घडली आहे. यात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे. सध्या घटनास्थळी एनडीआरफचे पथक दाखल झाले आहे. तसेच मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचावकार्य सुरु आहे.
विक्रोळीत तीन, तर भांडुपमध्ये एकाचा मृत्यू
तर दुसरीकडे विक्रोळी पश्चिम भागातील लाल बहादूर शास्त्री मार्गावरील पंचशील चाळीतील सूर्या नगर परिसरात ही घटना घडली. शनिवारी मध्यरात्री दोन वाजून 40 मिनिटांच्या सुमारास पाच ते सहा घरांवर दरड कोसळली. दुर्घटनाग्रस्त रहिवाशांना राजावाडी रुग्णालयात नेले असता, तिघा जणांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. तर दोन जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच भांडुप परिसरात वनविभागाची भिंत कोसळली आहे. यात 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.
[…] […]