मुंबईकरांनो, शुक्रवारीही घराबाहेर पडू नका! अतिवृष्टीबाबत हवामान विभागाकडून मोठी अपडेट

mumbai-rainfall-warning-meteorological-department-issue-red-alert-in-mumbai-till-friday-mumbai-news-update-today
mumbai-rainfall-warning-meteorological-department-issue-red-alert-in-mumbai-till-friday-mumbai-news-update-today

मुंबई : राज्यात विविध ठिकाणी पावसाने जोरदार झोपडले. मुंबई शहर, तसेच उपनगरांत गुरुवारी सकाळपासून मुसळधार (Mumbai Heavy Rains) पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने मुंबईला गुरुवारी सकाळी ८.३० पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला होता. दरम्यान, मुंबईतील पावसाचा जोर लक्षात घेऊन हवामान विभागाने शुक्रवारी सकाळी ८.३० पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

मुंबई शहर तसेच उपनगरांत पावसाचा जोर कायम आहे. यामुळे काही सखलभागांत पाणी साचले आहे. काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. तसेच लोकल सेवा धिम्या गतीने सुरू आहे. दरम्यान, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे अशी सूचना नागरिकांना करण्यात आली आहे.

बुधवार सकाळी ८.३० ते गुरुवार सकाळी ८.३० वाजेपर्यंत मुंबई शहर, उपनगरात पडलेला पाऊस

कुलाबा- २२३.२ मिलिमीटर

सांताक्रूझ – १४५.१ मिलिमीटर

बांद्रा – १०६.० मिलिमीटर

राम मंदिर – १६१.० मिलिमीटर

चेंबूर- ८६.५ मिलिमीटर

भायखळा- ११९.० मिलिमीटर

सीएसएमटी – १५३.५ मिलिमीटर

सायन – ११२.० मिलिमीटर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here