Mumbai Rains Alert l मुंबईसह चार जिल्ह्यांसाठी तीन तास धोक्याचे

हवामान विभागाने दिला इशारा

mumbai-rains-updates-mumbai-rains-weather-today-mumbai-weather
mumbai-rains-updates-mumbai-rains-weather-today-mumbai-weather

मुंबई l मुंबईत मुक्काम ठोकलेल्या पावसाने शनिवारी रात्रीपासून रौद्र रुप धारण केलं. रात्रभर झालेल्या पावसाने मुंबईत हाहाकार उडाला. मुंबई शहर आणि उपनगरांत सगळीकडे पाणीच पाणी झालं. मुंबईतील सखल भागात पाणी साचलं. तसेच अनेक ठिकाणी घरांमध्येही पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. दरम्यान, रविवारी दुपारी पावसाचा जोर कमी झाल्यानं पावसाचं पाणी ओसरलं. मात्र, चार वाजेनंतर पुन्हा पावसाने जोर पकडला असून, हवामान विभागाने मुंबईसह चार जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील तीन तास धोक्याचं असणार आहे.

मुंबई मागील २४ तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. शनिवारी (१७ जुलै) रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून, मुंबईतील जनजीवन कोलमडलं आहे. रविवारी सकाळपासून दुपारी १२ वाजेपर्यंत रेल्वेसह वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला झाल्याचं दिसून आलं. दुपारी पावसाचा जोर कमी झाल्यानं अनेक भागातील पाणी ओसरलं. त्यामुळे रेल्वे रुळावरील पाण्याचा निचरा होऊन लोकल सेवा सुरू झाली.

दुपारी चार वाजेपासून पावसाने जोर पकडला आहे. मुंबई, उपनगरांसह शेजारील जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील तीन तास या चारही जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला असून, नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

मुंबईतील अनेक भागात २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे रविवारी नालासोपारा, सायन या रेल्वे स्थानकांवरील रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्यात गेले होते. हवामान खात्याने मुंबई शहर व उपनगरी भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुढील तीन ते चार तासांत अनेक ठिकाणी गडगडाटासह, विजांचा कडकडाट व जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here