School Reopen l मुंबईत एक दिवसाआड भरणार शाळा!

महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली माहिती

mumbai-school-reopen-one-student-one-bench-school-and-parents-responsible-for-student-health-said-mayor-kishori-pednekar-news-update
mumbai-school-reopen-one-student-one-bench-school-and-parents-responsible-for-student-health-said-mayor-kishori-pednekar-news-update

मुंबई l मुंबईतील शाळा (Mumbai School Reopen) तब्बल दीड वर्षांच्या कालावधीनंतर सुरु करण्यात येत आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्यातील आणि मुंबईतील शाळा सुरु करण्याची परवानगी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तर मुंबईतील शाळा या एद दिवसाआड सुरु करण्यात येणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी सांगितले आहे.

विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही याचा निर्णय पालकांनी घ्यावा

विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही याचा निर्णय पालकांनी घ्यायचा आहे. पुर्ण क्षमतेने विद्यार्थी शाळेत येणार असतील तर दोन सत्रांत शाळा सुरु करण्यात येणार असून एका बेंचवर एक विद्यार्थी तर एका वर्गात केवळ १५ ते २० असे आसनक्षमतेच्या ५० टक्के विद्यार्थ्यांना बसवण्यात येणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

पालकांनी शाळेशी आणि शाळा व्यवस्थापनाशी संपर्क करावा

मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला असून मुंबईतील शाळा सुरु करण्याबाबतची माहिती दिली आहे. मुंबईतील सर्व शाळा येत्या ४ ऑक्टोबरला सुरु करण्यात येत असून पाललकांच्या संमतीनेच विद्यार्थ्यांना शाळेत बसवण्यात येणार असल्याचे पेडणेकर यांनी म्हटलं आहे. पालकांनी शाळेशी आणि शाळा व्यवस्थापनाशी संपर्क करावा, जेणेकरुन संमीत पत्र मिळेल ते भरुन शाळेत जमा करावे.

तेव्हा विद्यार्थ्यांना शाळेत बसवण्यात येईल. तसेच ज्या शाळा सुरु होणार आहेत. तसेच ज्या महानगरपालिकेच्या शाळा आरोग्य सेंटरला कनेक्ट राहतील ज्या शाळा खासगी आहेत त्यांनी महानगरपालिका आरोग्य सेंटरशी कनेक्ट राहाव अन्यथा खासगी आरोग्य सेंटरशी कनेक्ट राहणे गरजेचे आहे. एखाद्या विद्यार्थ्याला सर्दी खोकला झाल्याची लक्षणे दिसल्यास त्याला रुग्णालयात नेले पाहिजे, आरोग्याची काळजी घेणे त्याची लक्षणे, विद्यार्थ्यांवर शाळा प्रशासनाचे लक्ष असले पाहिजे असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

एका बाकावर एक विद्यार्थी

सुरक्षितता आणि दक्षता घेणे गरजेचे आहे. शाळेत ५० विद्यार्थी असतील आणि सर्व विद्यार्थ्यांना घरुन परवानगी मिळाली तर त्यांना दोन सत्रात बोलवण्यात येईल एका बाकावर एक विद्यार्थी बसवण्यात येईल.

उर्वरित शिक्षकांनी तात्काळ लसीकरण करुन घ्यावे

विद्यार्थ्याला मास्क, सॅनिटायझर देऊ परंतु विद्यार्थ्यांसोबत एक अधिक मास्क आणि सॅनिटायझर ठेवावे असे आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. शाळेत शिक्षक आहेत त्यातील ८ वी ९ वी १० वीच्या शिक्षकांचे कोरोना लसीकरण पुर्ण झालं आहे. तर इतर शिक्षकांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे. उर्वरित शिक्षकांनी तात्काळ लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन पेडणेकर यांनी सर्व शिक्षकांना केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here