Mumbai Bridge Collapse l मुंबईत बीकेसीमध्ये निर्माणाधीन पूलाचा स्लॅब कोसळला, १४ जण जखमी

mumbai under construction bridge collapses in mumbai's Bandra Kurla Complex, 14 injured
mumbai under construction bridge collapses in mumbai's Bandra Kurla Complex, 14 injured

मुंबई l मुंबईतील बीकेसीमध्ये आज पहाटे साडे चारच्या सुमारास निर्माणाधीन पूलाचा स्लॅब कोसळला. या घटनेमध्ये १४ मजूर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. बीकेसीच्या एमटीएनएल जंक्शनसमोरील आज पहाटे अचानक ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत काही मजुरांनी पूलावरून उड्या मारल्या तर काही जण थेट पाण्यामध्ये कोसळल्याचे समोर येत आहे. दुर्घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. (Mumbai under construction bridge collapses in mumbai’s Bandra Kurla Complex, 14 injured)

एमएमआरडीए प्राधिकरणाच्या माध्यमातून वांद्रे, एमटीएनएल जंक्शन, बीकेसी या ठिकाणी सध्या एका उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. या पुलाचा गर्डर शुक्रवारी पहाटे मुंबईकर झोपेत असताना अचानकपणे कोसळला. त्याबरोबर मोठा आवाज झाला. यावेळी, या पुलाचे बांधकाम करणाऱ्या अंदाजे २५ कामगारांपैकी काही कामगारांनी गर्डर कोसळत असतानाच जीव वाचविण्यासाठी पुलाच्या भागावरून खाली उड्या मारल्या.

तर काहीजण पाण्याच्या टाकीत पडले. या एकूण दुर्घटनेत १४ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्यांना मार लागल्याने ते कमी- अधिक प्रमाणात जखमी झाल्याचे समजते. सध्या या जखमींवर व्ही.एन.देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या गर्डरच्या खालील भागात कोणी कामगार दबला गेला नाही अथवा सापडला नाही, असे एक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

सदर दुर्घटना भल्या पहाटेच्या सुमारास काहीशा अंधारात घडल्याने नेमके कोणाला किती प्रमाणात मार लागला व कोण किती गंभीर जखमी झाले हे नीटपणे समजू शकलेले नाही. मात्र या सर्व जखमींना तातडीने पालिकेच्या व्ही. एन.देसाई रुग्णालयात उपचरासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर दुर्घटना का व कशी काय घडली, त्याला जबाबदार कोण याबाबत स्थानिक पोलीस, अग्निशमन दल, एमएमआरडीएचे अधिकारी आदी यंत्रणा अधिक तपास करीत असल्याचे समजतेय.

व्ही.एन.देसाई रुग्णालयातील डॉक्टर शशांक यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण १४ जण जखमी झाले आहेत. त्यांची नावे पुढील प्रमाणे..

 • अनिल सिंग (वय २८)
 • अरविंद सिंग (वय २९)
 • अझर अली (वय २६)
 • मुस्तफ अली (वय २८)
 • रियाझुद्दीन (वय २३)
 • मोटलब अली (वय २८)
 • रियाझू अली (वय २१)
 • श्रावण (वय ४९)
 • अतिश अली (वय २२)
 • Rlis अली (वय २२)
 • अजीज-उल-हक (वय २९)
 • परवेझ (वय २२)
 • अकबर अली (वय २५)
 • श्रीमंद (वय २५)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here