मुनावर हा पहिल्या दिवसापासून सर्वात मजबूत आणि चाहत्यांच्या आवडत्या स्पर्धकांपैकी एक होता. आणि त्याने विजेता बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरल्यावर स्वतःचा खेळ सिद्ध केला.
ट्रॉफी जिंकल्यावर मुनावरची पहिली प्रतिक्रिया
बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यावर फोटो शेअर करताना मुनावरने कॅप्शनमध्ये लिहिले की, “जनता, तुम्हाला खुप खुप धन्यवाद! तुमच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे बिग बॉसची ट्रॉफी डोंगरीत आणली आहे. तुमच्या सर्व मार्गदर्शनासाठी मोठ्या भावासारखा असणाऱ्या सलमान खान यांचे विशेष आभार. संपूर्ण #munawarkijanta आणि #munawarkewarrior या सर्वांचे मनापासून धन्यवाद.
View this post on Instagram
”
मुनावरवर बक्षीसांचा वर्षाव
मुनावर बिग बॉस जिंकताच त्याला ट्रॉफी, 50 लाख रुपये आणि एक आलिशान कार भेट म्हणून मिळाली आहे. ट्रॉफी जिंकल्यानंतर मुनावरने सोशल मीडियावर सलमान खानसोबतचा एक फोटो शेअर केला आणि त्याच्या चाहत्यांना सतत पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले.
Congratulations mere bhai @munawar.faruqui keep shining…
Best birthday gift by God almighty that is respect !!!#MunawarFaraqui𓃵 #MCStan pic.twitter.com/gmHS7ksREL— 🇮🇳 HINDI RECORDS ✍️🇮🇳 (@devraj92199335) January 28, 2024
अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, अरुण माशेट्टी आणि मन्नारा चोप्रा हे देखील पहिल्या पाच अंतिम फेरीत होते. अरुण आणि अंकिता यांना प्रथम फिनालेमधून बाहेर जावे आले. आणि मन्नारा या शोची दुसरी उपविजेती ठरली. अभिषेक कुमार आणि मुनावर फारुकी यांच्यात अंतिम सामना झाला आणि नंतर ट्रॉफी जिंकली.