Bappi Lahiri passes away : प्रसिध्द गायक, संगीतकार बप्पीदा यांचे निधन

musician-bappi-lahiri-passed-away-news-update
musician-bappi-lahiri-passed-away-news-update

मुंबई:प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांचे निधन झाले. मुंबईतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ६९ वर्षीय बप्पी लहरी हे गेल्या काही काळापासून आजारी होते. मुंबईत जुहूतील क्रिटी केअर रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. काल रात्री ११ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या वर्षी कोरोनाची त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

बप्पीदांनी काही दिवसांपूर्वी त्यांनी बिग बॅासच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. भारतात डिस्को म्युझिक आणणारे म्हणजेच बप्पीदा अशी त्यांची खास ओळख होती. त्यांनी १९८० ते २००० या तीन दशकात आपल्या संगीताने लोकांना भारावून टाकलं. किशोर कुमार , लता दीदी, आशा ताई , उषा उथुप , सुरेश वाडकर , सुदेश भोसले या अनेक गायकांसोबत काम केलं. त्यांच्या जाण्यानी रेट्रो म्युझिकचं पर्व संपलेलं आहे असचं म्हणावं लागेल.

बप्पी लहरी यांनी 1970-80 च्या दशकाच्या उत्तरार्धात ‘चलते चलते’, ‘डिस्को डान्सर’ आणि ‘शराबी’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये लोकप्रिय गाणी दिली आहेत. भंकस नावाचे त्यांचे शेवटचे बॉलीवूड गाणे 2020 च्या ‘बागी 3’ चित्रपटासाठी होते. लहरी यांनी शेवटची भूमिका सलमान खानसोबत बिग बॉस 15 या रिअॅलिटी शोमध्ये केली होती. यावेळी नातू स्वस्तिकच्या ‘बच्चा पार्टी’ या नवीन गाण्याचा प्रमोशन सोहळा पार पडला.

मागील वर्षी एप्रिल महिन्यात त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. यावेळी त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं. मात्र, काही दिवसांनी प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here