नागपुरात भाजपला धक्का; महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले विजयी!

nagpur-division-teacher-constituency-bjp-mavia-adbale-leads-by-7-thousand-news-update-today
nagpur-division-teacher-constituency-bjp-mavia-adbale-leads-by-7-thousand-news-update-today

नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार नागोराव गाणार यांचा पराभव केला. यामुळे भाजपला चांगलाच दणका बसला आहे.

पहिल्या फेरीच्या मतमोजणीत अडबाले यांना १४०७१ तर गाणार यांना ६३०९ मते मिळाली. एकूण ७ हजाराहून अधिक मतांनी अडबाले आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत मतांचा कोटा पूर्ण करीत विजयावर शिक्कामोर्तब केले.

हेही वाचा: मराठवाडा शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीच्या विक्रम काळेंचा चौथ्यांदा ‘विक्रम’!

दहा वर्षापासून भाजपकडे असलेली नागपूरची जागा महाविकास आघाडीने जिंकली भाजपने गाणार यांची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, फडणवीस, गडकरी यांनी त्यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या होत्या. दरम्यान, पहिल्या फेरीत अडबाले यांनी निर्णायक आघाडी घेतल्याने त्यांच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here