महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या, अबू आझमींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

name-of-maharashtra-rename-as-chhatrapati-shivaji-maharaj-or-swarajya-said-mla abu-azmi-to-cm-uddhav-thackeray

मुंबई : औरंगाबाद Aurangabad शहराचे नामांतरणावरून राजकारण चांगले तापले आहे. आता अहमदनगर Ahmednagar शहराचे नावही बदलण्याची मागणी होऊ लागली. नामांतराच्या मुद्द्यावरुन समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी Abu Azmi Azmi, SP state president यांनी थेट महाराष्ट्राचे Maharashtra नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या. अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

अबू आझमी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray यांना पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी म्हटलं, “सध्या महाराष्ट्रात औरंगाबादचे नामांतरण करण्याची चर्चा सुरू आहे. जर नाव बदलून प्रदेशाचा विकास होणार असे तर नक्कीच नामांतरण केलं जावं.

जे राजकारण सुरू आहे ते बंद करा

मात्र, सर्वप्रथम रायगडचे नाव बदलून संभाजीनगर ठेवण्यात यावे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं नाव छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावं किंवा ‘स्वराज्य’ असे ठेवण्यात यावे. जर तुम्ही असे करु शकत नाही तर औरंगाबाद शहराच्या नामांतरणावरुन जे राजकारण सुरू आहे ते बंद करा.

शहरांचे नाव बदलून कोणताही विकास होणार नाही

अबू आझमी यांनी म्हटलं, शहरांचे नाव बदलून कोणताही विकास होणार नाही. कुणाचे पोट भरणार नाही. जुन्या शहरांचे नामांतरण बदलून काय होणार आहे? नवं शहर स्थापन होत असेल तर वेगळी गोष्ट आहे.

औरंगाबाद, अहमदनगर यांचा एक इतिहास आहे. नागरिकांना डिवचण्याचं काम शोभत नाही. उत्तरप्रदेशातील मुख्यमंत्र्यांसारखे हिंदू आणि मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचं काम उद्धवजी तुम्हाला शोभत नाही.

या पूर्वीही ही मागणी केली होती

अबू आझमी यांनी नवी मुंबईला शिवाजी महाराजांचे, पुण्याला संभाजी महाराजांचे नाव द्या अशी मागणी या पूर्वी 28 नोव्हेंबर 2018 रोजी विधानसभेमध्ये केली होतीय केवळ इतक्यावरच न थांबताा आझमी यांनी ठाणे आणि पुण्याचे नाव बदलून शिवाजी महाराजांची आई राजमाता जिजाबाई  आणि पुत्र संभाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी केली होती. ठाण्याचे नाव बदलून जिजामाता नगर असे नाव द्या अशी मागणी केली होती. 

हेही वाचा : Badaun Gang  Rape l अंगणवाडी सेविकेचा सामूहिक बलात्कार, गुप्तांगात रॉड टाकून हत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here