काँग्रेस बाप आहे; बापच राहणार : नाना पटोले

Nana patole congress bjp modi government news update
Nana patole congress bjp modi government news update

औरंगाबाद: भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर देतांना सांगितले की, काँग्रेसवर कुणी कितीही टीका केली तरी काँग्रेस बाप आहे; बापच राहणार असा टोला लगावला. नाना पटोले हे रविवारी काँग्रेसच्या डिजीटल सदस्य नोंदणी कार्यक्रमासाठी औरंगाबादेत आले होते. पत्रकारांशी बोलतांना त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, भाजपची विचारधारा ही जाती धर्मामध्ये फुट पाडून राज्य करण्याची आहे. मागील ८ वर्षात या पद्धतीचे राजकारण जोरात सुरु आहे. या देशात सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने रहात असताना त्याला छेद देण्याचेज काम भाजपकडून केले जात आहे. देशाची संपत्ती विकून देश चालवला जात आहे. सार्वजनिक क्षेत्रातील २६ उद्योग नरेंद्र मोदी सरकारने विकून टाकले. देश उद्ध्वस्थ करण्याचे काम सुरु आहे. देशाला या विचारधारेपासून वाचवण्याची गरज आहे.

भाजपाकडून मातोश्रीला बदनाम करण्याचे काम सुरु आहे. भाजपाकडून महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर खोटे आरोप करुन त्यांना अडकवण्याचे काम सुरु आहे. नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले. नारायण राणे, कृपाशंकर सिंह यांच्यावर भाजपने पूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. हेच नेते आता भाजपात आहेत. दररोज महाविकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम करायचे आहे. खोटे आरोप लावायचे आता त्या आरोपांची राज्यातील जनतेला सवय झाली असून जनताही त्याकडे मनोरंजन म्हणून बघत आहे.  

भाजपने खोटा 130 तासाचा पेनड्राईव्ह आणला. परंतु तो पंधरा मिनिटांचाच होता. त्यांच्याकडे पेनड्राईव्ह आहे आम्ही कव्हर ड्राईव्ह मारु असे संजय राऊत म्हणाले होते. त्याबाबत नाना पटोले म्हणाले, राऊतांकडे कोणता कव्हरड्राईव्ह आहे मला माहित नाही. परंतु भाजपाकडून खोटा प्रचार सुरु आहे. विविध यंत्रणांचा वापर करुन महाविकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे काम सुरु आहे. परंतु त्याचा आम्ही मुकाबला करु. असा इशारा नाना पटोले यांनी भाजपला दिला.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.कल्याण काळे,माजी आमदार नामदेव पवार, शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, मुजाहेद खान, डॉ. जितेंद्र देहाडे, डॉ.जफर खान, योगेश मसलगे, अशोक सायन्ना, इब्राहीम पठाण, शेख अथहर, राम शेळके, खालेद पठाण यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होते.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here