मागच्या सरकारमध्ये चिक्की फेमस होती; आता…

‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्याला स्वबळावर लढायच्या आहेत’, त्याही पुणे जिल्ह्यात. एका बदमाश व्यवस्थेच्या विरोधात आपल्याला ही लढाई लढायची आहे”, असं आवाहन पटोले यांनी केलं.

The corruption of Shinde-Fadnavis to 'Samruddhi': Nana Patole
The corruption of Shinde-Fadnavis to 'Samruddhi': Nana Patole

मुंबई l काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी लोणावळ्यात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात पुन्हा स्वबळाचा नारा दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray आणि उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्यावर टीका केली. भाषणावेळी नाना पटोले यांनी भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे Pankaja Munde यांनाही अप्रत्यक्षरित्या टोला लगावला.

पंकजा मुंडे महिला व बालविकास मंत्री असताना त्यांच्यावर चिक्की खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. या गाजलेल्या चिक्की घोटाळ्याचा उल्लेख करत नाना पटोलेंनी मिश्कील भाष्य केलं.

लोणावळ्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाना पटोले म्हणाले,”लोणावळ्याची चिक्की जगभर प्रसिद्ध आहे. मागच्या सरकारमध्ये चिक्की फेमस झाली. मात्र, आता काय हाल झाले आहे ते बघा तुम्हीच,” असा टोला त्यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांचं नाव न घेता लगावला.

पुढे बोलताना ते म्हणाले, “उभ्या देशाला ज्या काँग्रेस विचारानं मोठं केलं, मुख्य प्रवाहात आणलं. त्या काँग्रेसचे गोडवे सांगण्यामध्ये आपण सर्व कमी पडलो. मागच्या काळात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होतं. नरेंद्र मोदींच्या सरकारला सात वर्षे झाली आहेत. या सरकारने  कुणाला जिवंत ठेवलं नाही सर्वाना मारून टाकलं”, अशी टीका पटोले यांनी मोदी सरकारवर केली.

 ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्याला स्वबळावर लढायच्या आहेत’, असा जिल्हाध्यक्षांच्या विधानाचा धागा पकडत नाना पटोले म्हणाले, “निवडणुका स्वबळावर लढायच्या आहेत, त्याही पुणे जिल्ह्यात. एका बदमाश व्यवस्थेच्या विरोधात आपल्याला ही लढाई लढायची आहे”, असं आवाहन पटोले यांनी केलं.

 “मोठी जहाज बुडण्याची जास्त भीती असते. लहान होडीला नसते. ती कशीबशी ती निघून जाते. मोठी जहाज लवकर डुबतात. माझा इशारा तुम्ही समजून घ्या… मी पुण्याच्या दौऱ्याला आलो की मोठ्या जहाजाला खूप त्रास होतो. दुष्मनाकडे लक्ष जास्त देण्यापेक्षा आपण आपल्या घराकडे लक्ष देऊन माणसं सांभाळून प्रत्येकाला कामाला लावा”, असा सूचक इशारा पटोले यांनी कार्यकर्त्यांना दिला.

“महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणायला मोठा काळ लागणार नाही. जे काही पाहतोय महाराष्ट्रात फक्त वातावरण निर्मिती मी करून देईल. बूथ प्रॉपर बनवा. महाराष्ट्रात सत्ता आणायची हा मानस केला आहे”, असं आवाहन त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केलं.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोणावळ्यात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात केलेल्या भाषणाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. पटोले यांनी पुन्हा स्वबळाचा पुनरुच्चार करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.

नाना पटोले यांनी भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनाही अप्रत्यक्षरित्या टोला लगावला. पंकजा मुंडे महिला व बालविकास मंत्री असताना त्यांच्यावर चिक्की खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. या गाजलेल्या चिक्की घोटाळ्याचा उल्लेख करत नाना पटोलेंनी मिश्कील भाष्य केलं.

लोणावळ्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाना पटोले म्हणाले,”लोणावळ्याची चिक्की जगभर प्रसिद्ध आहे. मागच्या सरकारमध्ये चिक्की फेमस झाली. मात्र, आता काय हाल झाले आहे ते बघा तुम्हीच,” असा टोला त्यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांचं नाव न घेता लगावला.

पुढे बोलताना ते म्हणाले, “उभ्या देशाला ज्या काँग्रेस विचारानं मोठं केलं, मुख्य प्रवाहात आणलं. त्या काँग्रेसचे गोडवे सांगण्यामध्ये आपण सर्व कमी पडलो. मागच्या काळात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होतं. नरेंद्र मोदींच्या सरकारला सात वर्षे झाली आहेत. या सरकारने  कुणाला जिवंत ठेवलं नाही सर्वाना मारून टाकलं”, अशी टीका पटोले यांनी मोदी सरकारवर केली.

हेही वाचा

Father Stan Swamy l स्टॅन स्वामींची तर तुरुंगात हत्याच झाली; संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा

Vidhan Sabha अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहील! शरद पवारांनी काढली भास्कर जाधवांची हवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here