Nana patole l नाना पटोले काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष!

Give Union Home Minister Amit Shah the wisdom to work in the interest of the country!: Nana Patole
Give Union Home Minister Amit Shah the wisdom to work in the interest of the country!: Nana Patole

मुंबई: काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष पदावरून जोरदार रस्सीखेच सुरु असताना पक्षनेतृत्वाने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले Nana patole यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.  काँग्रेसला आक्रमक चेहरा मिळणार आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी मंत्री विजय वडेट्टीवार,खासदार राजीव सातव यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. वडेट्टीवारांनी पक्षश्रेष्ठींकडे अध्यक्षपदासाठी इच्छाही व्यक्त केली होती मात्र अध्यक्षपदाची माळ नाना पटोले यांच्या गळ्यात टाकण्यात आली आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली.  

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आपल्याच मित्रपक्ष शिवसेनेविरोधात उघड भूमिका घेताना आक्रमक दिसले होते. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद आपल्याकडेच कायम राहावं यासाठी थोरात आक्रमक झाल्याचं देखील काहींचं म्हणणं होतं.

मात्र, दिल्लीहून नाना पटोलेंचं नाव निश्चित करण्यात आल्याचं आता समजतंय. यासाठी त्यांना विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. मात्र, महाविकासआघाडी सरकारकडे बहुमत असल्यामुळे पुढील हंगामी अध्यक्ष आणि पूर्णवेळ अध्यक्ष देखील महाविकासआघाडीचाच असणार आहे.

नाना पटोले हा आक्रमक चेहरा आहे. पक्षबांधणीसाठी त्याचा फायदा होईल त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली जाणार आहे. हे निश्चित झालं असून आता फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे.

हेही वाचा : गुजरातमध्ये अपघात: ट्रकने फुटपाथवर झोपलेल्या 15 मजुरांना चिरडले

प्रदेशाध्यक्षपद दिल्यास पदाला न्याय देऊ

काही दिवसांपूर्वीच नाना पटोले यांनी प्रदेशाध्यपद दिल्यास पदाला न्याय देऊ असं सांगितलं होतं. पक्षश्रेष्ठींनी जबाबदारी दिल्यास निश्चित चांगल्या प्रकारे पार पाडू.

हेही वाचा : किसानों और सरकार के बीच आज की बैठक टली, अब कब होगी बातचीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here