Sambhaji Bhide : भिडेंच्या डोक्यात स्त्री द्वेषाचे किडे! : नाना पटोले

“तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही आहे,” असं वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केलं आहे. यावरून प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले चांगलेच संतापले. भिडेंच्या डोक्यात स्त्री द्वेषाचे किडे असे ट्विट पटोले यांनी केले.

Implement new syllabus of MPSC after two years for the benefit of students!: Nana Patole
Nana Patole said the worms of woman hatred in Bhide's head!

मुंबई: शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji Bhide) वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. भिडे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शिंदे यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी भिडे यांच्याशी संवाद साधला. त्यात एका मराठी वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने भिंडेंना प्रश्न विचारला, “तुम्ही आज मंत्रालयात कोणाची भेट घेतली?,” यावर “तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही आहे,” असं वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केलं आहे. यावरून प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले चांगलेच संतापले. भिडेंच्या डोक्यात स्त्री द्वेषाचे किडे असे ट्विट पटोले यांनी केले.

संभाजी भिडे यांच्या वक्तव्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “संभाजी भिडे यांनी यापूर्वीही ‘आंबे खाल्याने मुलं होतात’, असं वक्तव्य केलं होतं. एक महिला पत्रकार शिक्षण घेऊन तिथेपर्यंत पोहचली आहे. टिकलीवरून महिलेची पात्रता आणि पद ठरवणे चुकीचं आहे,” असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.

हेही वाचा: ‘कुंकू लाव मगच बोलतो’ संभाजी भिडेंच्या वक्तव्याची महिला आयोगाकडून दखल; रुपाली चाकणकर म्हणाल्या, “समाजाची विकृती…”

“ही समाजाची विकृती आहे. सातत्याने महिलांना दुय्यम लेखणाऱ्यांची विकृती नाहीशी करायची आहे. महिला आयोगाच्या वतीने याचा जाहीर निषेध व्यक्त करते. तसेच, संभाजी भिडेंना महिला आयोगाच्या वतीने नोटीस पाठवण्यात येईल. त्यांनी आपल्या वक्तव्याचा खुलासा करावा,” असेही रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here